काय सांगता,मुरुमांची समस्या असल्यास पेरूचे पान फायदेशीर आहे.

बुधवार, 31 मार्च 2021 (09:25 IST)
पेरूची पाने त्वचेच्या समस्येला दूर करण्याचे काम करतात. त्वचे संबंधित समस्या असल्यास पेरूच्या पानाचे फेसपॅक वापरून बघा. त्वचेवर बऱ्याच वेळा हानिकारक रसायनयुक्त उत्पादनांचा वापर केल्याने त्वचेच्या समस्या जसे की मुरूम होणे,काळे डाग होणे सारख्या समस्या उद्भवतात. काही नैसर्गिक उपाय करून आपण या पासून सुटका मिळवू शकतो. या साठी पेरूची पाने फायदेशीर आहे. या मुळे त्वचा चांगली होते. चला तर मग जाणून घेऊ या.  
पेरूच्या पानांमध्ये आयुर्वेदिक गुणधर्म असतात. पेरूच्या पानाचे फेसपॅक लावल्याने मुरुमांची समस्या नाहीशी होते. या मध्ये पोटॅशियम आणि फॉलिक ऍसिड सारखे सूक्ष्म घटक आढळतात. जे त्वचेवर थेट परिणाम करतात. पेरूच्या पानात  आयसोफ्लाव्होनॉइड्स, गॅलिक ऍसिड, एस्कॉर्बिक ऍसिड, कॅरोटीनोइड्स आणि त्वचेचा संसर्ग आणि जळजळ बरे होण्यासारखे  सक्रिय घटक असतात. अँटीऑक्सिडंट त्वचेचे नुकसान बरे करू शकतात. '
याचे फेसपॅक बनविण्यासाठी पेरूचे पाने वाटून घ्या आणि पेस्ट बनवून घ्या. 
कसे लावायचे -
हे लावण्यासाठी सर्वप्रथम चेहरा कोमट पाण्याने आणि सौम्य क्लींजरने धुवून घ्या. हे पेस्ट चेहऱ्यावर लावा. पेस्ट नेहमीच ताजे लावा. पेस्ट लावल्यावर कोरडे होऊ द्या. नंतर थंड पाण्याने धुवून घ्या. 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती