Kojagiri Pornima 2023 : कोजागिरी पौर्णिमा पूजा विधी
शनिवार, 28 ऑक्टोबर 2023 (08:02 IST)
Kojagiri Pornima 2023 : शरद पौर्णिमा अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरी केली जाते. याला रास पौर्णिमा, कोजागरी पौर्णिमा, आश्विनी पौर्णिमा किंवा कौमुदी व्रत असेही म्हणतात. शरद पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ असतो. असे म्हटले जाते की शरद पौर्णिमेच्या रात्री चंद्रातून निघणारी किरणे अमृतसारखी असतात, म्हणून या दिवशी लोक खीर किंवा दुध तयार करतात आणि रात्री चंद्रप्रकाशात ठेवतात आणि नंतर प्रसाद म्हणून खातात. शरद पौर्णिमेचा दिवस देवी लक्ष्मीला समर्पित आहे. असे मानले जाते की शरद पौर्णिमेच्या रात्री माता लक्ष्मी पृथ्वीवर फिरते आणि आपल्या भक्तांना आशीर्वाद देते. या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केल्याने घर नेहमी ऐश्वर्याने भरलेले राहते. या दिवशी लक्ष्मीची पूजा केल्याने ऐश्वर्य प्राप्ती होते. चला तर मग पूजा विधी जाणून घेऊ या.
शरद पौर्णिमेला संध्याकाळी अंघोळ करून स्वच्छ वस्त्र धारण करावे.
या दिवशी रात्रीच्या पहिल्या प्रहरी देवी लक्ष्मी, ऐरावतावर बसलेल्या इंद्र आणि बळीराजा यांची पूजा करावी.
या दिवशी लक्ष्मी देवीच्या व्रताचं संकल्प करावं.
पूजा स्थळी लक्ष्मी देवीची मूर्ती किंवा फोटो ठेवावा.