कृतार्थ होईल जीवन, तुझ्या येण्यानी,
मखरात बस, लेकरा बाळा संग,
करावा आराम, काय काय हवं तुला सांग!
माझ्या परी मी करीन गे तुझी सेवा,
करील जे जे मी त्यात आनंद मानून घ्यावा,
काही काही गोष्टी आई, शब्दांत कश्या मांडू ग !
माझ्या मनातील भाव तूच समजून घे ग!
आवाहन तुझं करतांना अतीव आनंद सकळा होई,
जेवू घालतांना तुला, प्रेमाचे भरते येई,
तुही येते माहेरपणा , तितक्याच ओढीने,
गरीब -श्रीमंत असो, तो ही करतो श्रद्धेने,
हीच परंपरा अनंत काळापर्यंत चालवावी,
महालक्ष्मी आई, सर्वांनाच तू पावावी!