किती सेक्सी आहात आपण?

विपरीत लिंगाचे लोकं आपल्याकडे किती आकर्षित होतात हे एक विज्ञान आहे. ते काही विशेष पाहून आपल्याकडे खेचले जातात. हेच आकर्षण ठरवतं की आपण किती सेक्सी आहात.
काय असतं आकर्षण : शास्त्रज्ञांमाणे पार्टनर निवडण्याचा मुख्य उद्देश अपत्य जन्माला घालणे असतं. निरोगी पार्टनरच निरोगी संतान देऊ शकतं. तर लोकं आपला चेहरा पाहून ठरवून घेतात की आपल्यात पार्टनर बनण्याची योग्यता आहे की नाही. अर्थातच आपण किती सेक्सी आहात.
 
आरोग्यच सर्वस्व आहे : या सर्वांचे मूळ आरोग्य आहे. कॅनेडियन साइकॉलजिस्ट डेनियल रे आणि निकोलस रूल यांनी आपल्या लेख करंट डायरेक्शन याच्यात सांगितले आहे की आपले आरोग्य आपल्या चेहर्‍यावरून कळून येतं. कसे जाणून घ्या...

चेहर्‍याचा लालसरपणा : जर आपण निरोगी असाल तर आपला रक्तसंचार सुरळीत राहील. त्यात ऑक्सिजनची योग्य मात्रा असेल. आणि हे सर्व दिसून येईल आपल्या चेहर्‍यावर.
 
पिवळी चमक : तसं तर चेहरा पिवळा पडणे रोगी असण्याचे दर्शवतं परंतू चेहर्‍यावर पिवळी चमक येणं सेक्सी असल्याचे प्रतीक आहे. योग्य आहाराने अर्थात भरपूर फळ आणि भाज्या सेवन केल्याने चेहर्‍यावर पिवळी चमक येते.
चेहर्‍यावर फॅट : आपल्या चेहर्‍यावर अधिक फॅट असेल, तर आपलं निरोगी असणं संशयास्पद असेल. जितकं संशयास्पद आपलं आरोग्य असेल, तितकंच आपण इतरांपेक्षा कमी सेक्सी दिसाल.

वेबदुनिया वर वाचा