काय आपण स्वत: नष्ट करत आहात आपले स्पर्म?

काय आपण स्वत: आपले स्पर्म नष्ट करत आहात? प्रसिद्ध जर्नल बीएमजे ओपन यांच्याप्रमाणे प्रत्येक चारमधून एक तरुणाचे स्पर्म कमजोर आहेत. पूर्ण दुनियेत स्पर्मच्या गुणवत्तेत उतार आल्याचे बघण्यात आले आहे.
 
‍तज्ज्ञांप्रमाणे यामागील कारण नोकरी, लाइफस्टाइल आणि विशेष केमिकल्स आहे. स्पर्मची क्वालिटी पडणे अर्थात प्रजनन शक्ती कमजोर होणे. आपल्या लाइफस्टाइलमुळे आपलेही स्पर्म कमजोर तर होत नाहीये न?
बीएमजे ओपन यांच्याप्रमाणे स्पर्मच्या खराब गुणवत्तेमुळे  20 टक्के जोडपे मुलं पैदा करण्यात अक्षम झाले आहेत. ही एका देशाची नसून पूर्ण विश्वात घडत आहे. ब्रिटिश जर्नल ऑफ स्पोर्ट्स मेडिसीन याप्रमाणे जर आपण एका आठवड्यात 20 तास किंवा याहून अधिक ‍टीव्ही बघत असाल तर सतर्क होण्याची गरज आहे. अधिक टीव्ही बघण्यासाचा सरळ संबंध स्पर्मच्या क्वालिटीशी आहे.
 
आर्काइव ऑफ इंटरनल मेडिसीन याप्रमाणे लठ्ठपणाही स्पर्मचा वैरी आहे. सामान्य वजन असणार्‍या पुरूषांच्या तुलनेत लठ्ठ पुरूषांच्या स्पर्मची गुणवत्ता चांगली नसते. 42 टक्के लठ्ठ लोकांचे स्पर्म खराब असतात. म्हणून स्वत:च्या व्यायाम आणि आहारावर लक्ष देण्याची गरज आहे.
 
नोकरीमुळे आपल्या लाइफस्टाइलवर पडत असलेल्या विपरित परिणामाचे प्रभाव स्पर्मवर पडतो. इंटरनेशनल जर्नल ऑफ फर्टिलिटी अँड स्टर्लिटी याप्रमाणे माल ढोणारे मजदूर आणि शेफ सर्वात असुरक्षित असतात. यांना स्पर्मच्या क्वालिटीसंबंधी धोका अधिक असतो.
 
साइंटिफिक रिपोर्ट 2015 प्रमाणे बीपीएच्या अधिक प्रमाणाचा स्पर्म डीएनए नुकसानशी सरळ संबंध आहे. याने स्पर्म क्वालिटीवर प्रभाव पडतो.
 
आधुनिक लाइफस्टाइल, आहार आणि वातावरणामुळे स्थिती अजूनच वाईट होत चालली आहे. आता याबाबतीत हळगरजीपणा सोडून सावध होण्याची वेळ आली आहे.

वेबदुनिया वर वाचा