महिलांमध्ये ऑर्गैज्मला उत्तम बनवू शकतो गांजा (भांग) : स्टडी

मंगळवार, 14 मे 2019 (13:08 IST)
नुकतेच झालेल्या एका स्टडीमध्ये ही बाब समोर आली आहे की अमेरिकेत एक तृतीयांश महिलांनी सेक्सच्या अगोदर गांजेचा वापर करण्याची बाब स्वीकारली असून त्यांचे म्हणणे होते की गांजेचे सेवन केल्यानंतर त्यांना उत्तम ऑर्गैज्म जाणवले आणि सेक्सप्रती त्यांनी इच्छा अधिक जागृत झाली. सेक्शुअल मेडिसिन नावाच्या जरनलामध्ये या स्टडीला प्रकाशित करण्यात आले आहे.
 
गांजेचा वापर केल्यानंतर दुसर्‍यांदा देखील ऑर्गैज्म अनुभवले 
स्टडीमध्ये ही गोष्ट समोर आली आहे की ज्या महिलांनी सेक्सच्या आधी मारिजुआना अर्थात गांजेचा वापर केला होता त्यांना दुप्पट ऑर्गैज्म जाणवले त्या महिलांच्या तुलनेत ज्यांनी गांचेचा वापर केला नव्हता. स्टडीमध्ये सामील संशोधकांनी सांगितले की अमेरिकेत वयस्करांमध्ये गांजेचा वापर वाढला आहे कारण अमेरिकेच्या बर्‍याच राज्यांमध्ये कायदा मंजूर करून गांजेला मेडिकल वापर सोबतच मौज-मस्तीसाठी वापरण्याची परवानगी दिली आहे.
 
373 फीमेल पेशंट्सवर करण्यात आलेला सर्व्हे
या स्टडीसाठी अमेरिकेचे सेंट लुईस स्थित अॅकेडमिक मेडिकल सेंटरचे ऑब्स्टेट्रिक्स आणि गायनँकॉलजी विभागात 373 फीमेल पेशंट्सवर सर्व्हे करण्यात आला. सर्व्हेमध्ये सामील 127 महिला अर्थात किमान 34 टक्क्यांनी सेक्शुअल ऐक्टिविटीमध्ये सामील होण्याअगोदर गांजा यूज करण्याच्या गोष्टीला स्वीकारले. संशोधकांचे म्हणणे आहे की गांजेचा कुठल्याही व्यक्तीच्या सेक्शुअल हेल्थवर काय प्रभाव पडतो या बाबतीत रिसर्चमध्ये फारच कमी प्रमाणात आढळून आले आहे. महत्त्वाचे म्हणजे गांजा ब्रेनमध्ये उपस्थित कॅनाबिनॉयड रिसेप्टरवर काम करतो जो सेक्शुअल फंक्शनमध्ये सामील होतो.
गांजेचा सेक्स लाईफ आणि कामेच्छाशी लिंक आहे की नाही
या स्टडीत खास करून हे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे की गांजेचा महिलांच्या सेक्सलाइफमध्ये संतुष्टी, सेक्स ड्राईव, ऑर्गैज्म, लुब्रिकेशन आणि इंटरकोर्सदरम्यान होणार्‍या वेदनेशी काही संबंध आहे का?. स्टडीमध्ये सामील 197 महिला अर्थात किमान 52 टक्के महिलांनी गांजेचे सेवन बिलकुल नव्हते केले तर 49 महिलांनी अर्थात किमान 13 टक्के महिलांनी गांजेचा प्रयोग करण्याची बाब स्वीकारली पण सेक्सच्या आधी त्याचा वापर नव्हता केला असे देखील म्हटले आहे.
 
इंटरकोर्सच्या दरम्यान वेदना कमी झाल्या
स्टडीत ही बाब समोर आली की ज्या महिलांनी सेक्स अगोदर गांजेचे सेवन केले होते त्यांना सेक्स दरम्यान जास्त लुब्रिकेशन जाणवलं आणि इंटरकोर्समध्ये वेदना फारच कमी झाल्या अर्थात ज्या महिलांनी गांजेचा वापर बिलकुल नव्हता केला नव्हत्या त्यांच्या तुलनेत. पण या स्टडीचे आपले लिमिटेशन्स आहे आणि महिलांची संख्या कमी असल्यामुळे हे निश्चित करणे अवघड आहे की गांजेचे सेक्शुअल हेल्थवर कशाप्रकारे प्रभाव पडतो.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती