पुरुषांमध्ये सेक्स इच्छा कमी असण्याचे हे 3 कारण जाणून घ्या...

सोमवार, 18 मार्च 2019 (14:47 IST)
प्रणयक्रिडा हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाचा घटक असतो. यामुळे शरीर निरोगी राहण्यास मदत होते. तसेच मानसिक संतुलनही उत्तम राहते. पण, काही पुरूरुषांना ही इच्छा कमी असते. यामागे अनेक कारणे आहेत. या कारणांमुळेच पुरुषांना सेक्सचा आनंद लुटता येत नाही. याचे मुख्य कारण खाली देण्यात येत आहे.   
 
टेस्टोस्टेरोनची कमतरता 
हॉर्मोन्स टेस्टोस्टेरोनची कमतरता हे प्रणयाची इच्छा कमी होण्या मागचे प्रमुख कारण आहे. साधारण वयाच्या ४० व्या वर्षानंतर पुरूषांच्या रक्तामधील टेस्टोस्टेरोनची मात्रा कमी होणे ही सामान्य गोष्ट आहे. परंतु, काही पुरूषांना या समस्येचा लहान वयातच सामना करावा लागू शकतो. रक्तामधील टेस्टोस्टेरोनच्या कमरतेमुळे शरीरात थकवा, अनिद्रा तसेच प्रणयाची इच्छा न होणे या समस्या उद्भवू शकतात.   
 
शीघ्रपतन
सर्वसामान्यपणे पुरूषांमध्ये आढळणारी ही एक सामान्य समस्या आहे. या समस्येमुळे पुरूषांची प्रणय करण्याची इच्छा कमी होण्याची शक्यता असते. या समस्येमुळे पुरूषांमध्ये प्रणयाबद्दल नकारात्मक भावना निर्माण होवू शकते.
 
मांसपेशी कमकुवत असणे
प्रणयाची इच्छा कमी होण्याचे आणखी एक मुख्य कारण म्हणजे डिस्फंक्शन म्हणजेच पुरूषाच्या गुप्तांगामधील मांसपेशी कमजोर असणे. मुख्यता या समस्येचा सामना व्हिटॅमिन सीच्या कमरतेमुळे, सिगरेटचे सेवन तसेच अल्कोहोलच्या सेवनामुळे होवू शकते. अनेक वेळा अति ताणामुळे देखील मांसपेशी कमजोर पडू शकतात. व्हिटॅमिन बी युक्त पदार्थांच्या कमरतेमुळे अनेक पुरूषांची प्रणयाची इच्छा कमी होते. आहारामध्ये व्हिटॅमिन बी युक्त पदार्थांचे सेवन वाढवल्यास ही समस्या दूर होते. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती