सचिनला 'विश्वरत्न' मिळावे- लता मंगेशकर

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 20 वर्ष पूर्ण करणार सचिन तेंडुलकर हा यशाच्या एव्हरेस्टवर पोहचूनही विनम्र आहे. त्याची नाळ जमिनीशी जुळून राहिली आहे. क्रिकेटमधील त्याचे योगदान पाहता त्याला केवळ 'भारत रत्न' नव्हेतर 'विश्वरत्न' हा पुरस्कार दिला गेला पाहिजे, असे मत गाणसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी व्यक्त केले.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 20 वर्ष पूर्ण केल्याबद्दल सचिनचे अभिनंदन करुन त्या म्हणाल्या,' ईश्वराने त्याला आशीर्वाद द्यावा की तो अजून 40 वर्ष क्रिकेट खेळेल. त्याचा स्ट्रेट ड्रॉईव्ह मला खूप आवडतो. तो जेव्हा शतक करुन आभाळाकडे पाहण्याची त्याची पद्धत मला खूप भावते. 1999 मधील विश्वकरंडक स्पर्धेदरम्यान त्याच्या वडीलांचे निधन झाले होते. त्यावेळी अंत्यसंस्कार करुन तो परतला आणि त्याने शतक केले. हे शतक वडीलांना अर्पण करुन त्यांचे आशीर्वाद घेतले. तो क्षण खूपच भावनाप्रधान होतो.'

लता दिदी म्हणाल्या की, सचिनला मी प्रथम राज ठाकरे यांच्या निवासस्थानी भेटले होते. त्यावेळी त्याला साईबाबांची मुर्ती भेट दिली. त्यावेळी त्याने माझा चरणस्पर्श करीत तुम्ही मला आईप्रमाणे असल्याचे सांगितले. तो सर्वोच्च खेळाडूच नाही तर एक चांगला व्यक्तीही आहे.

वेबदुनिया वर वाचा