डॉ. मनमोहन सिंग यांना आदरांजली म्हणून ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय क्रिकेट संघाने हातावर काळ्या पट्टी बांधून खेळ खेळले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने एका निवेदनात म्हटले आहे की, “डॉ. मनमोहन सिंग यांच्या सन्मानार्थ भारतीय संघ काळ्या हातपट्ट्या घालून खेळत आहे. त्यांचे कर्तृत्व आणि योगदान सदैव स्मरणात राहील.”
2004 ते 2014 या काळात भारताचे पंतप्रधान म्हणून काम केलेले डॉ. सिंग यांना 1991 मध्ये भारताच्या आर्थिक सुधारणांचे मुख्य शिल्पकार म्हणून ओळखले जाते. त्यांच्या नेतृत्वाखाली देशाने आर्थिक संकटातून सावरले आणि आर्थिक उदारीकरणाच्या दिशेने पावले टाकली, जी आज भारताच्या प्रगतीचा पाया मानली जाते.