ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉक्सिंग डे कसोटीपूर्वी भारतीय कर्णधार रोहित शर्माला दुखापत झाली आहे. रविवारी सरावादरम्यान रोहितच्या गुडघ्याला दुखापत झाली. खरंतर, रोहित थ्रो डाउन स्पेशालिस्टसोबत सराव करत होता, तेव्हा चेंडू त्याच्या पॅडला लागला आणि त्याच्या गुडघ्याला लागला. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा चौथा सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 26 डिसेंबरपासून मेलबर्नमध्ये खेळवला जाणार आहे
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका सध्या १-१ अशी बरोबरीत आहे. पुढील कसोटी सामना जिंकून मालिकेत आघाडी घेण्यावर भारतीय संघाचे लक्ष असेल. रोहितपूर्वी भारतीय संघाचा फलंदाज केएल राहुललाही सरावाच्या वेळी दुखापत झाली होती. राहुलच्या हाताला दुखापत झाल्याने फिजिओला मैदानात यावे लागले.