सचिनच्या 13 हजार धावा पूर्ण

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने घरच्या मैदानावर विक्रम केला आहे. त्याच्या कसोटीत 13 हजार धावा पूर्ण झाल्या असून अशी कामगिरी करणारा तो एकमेव फलंदाज आहे. कसोटी आणि एकदिवसीक्रिकेटमध्यसर्वा‍धिक शतके, सर्वाधिक धावा हे विक्रम सचिनच्या नावावर आहेत.

ब्रेबॉन स्टेडियमवर सुरु असलेल्या कसोटीत सचिनने 30 वी धावा घेत कसोटीत 13 हजार धावा पूर्ण केल्या. त्याने कसोटीत 43 शतक आणि 54 अर्धशतक केले आहे. या सामन्यापूर्वी सचिनने 162 कसोटीत 54.95 च्या सरासरीने 12970 धावा केल्या होत्या. मुंबई कसोटीत सचिन 53 धावांवर बाद झाला. यामुळे कसोटीत त्याचा 13023 धावा झाल्या आहेत.

वेबदुनिया वर वाचा