युक्रेनच्या दुसऱ्या मोठ्या शहर खार्किववर रशियन सैनिकांचा हल्ला, अनेक भारतीय विद्यार्थी अडकले

रविवार, 27 फेब्रुवारी 2022 (17:43 IST)
युक्रेनमधील रशियन सैन्याने युद्धाच्या चौथ्या दिवशी कीवनंतर देशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर असलेल्या खार्किवमध्येही प्रवेश केला आहे. रशियन सैन्याने खार्किववर हल्ला करण्यास सुरुवात केली आहे. अनेक भारतीय विद्यार्थीही येथे अडकून पडले आहेत. रशियन सैन्यावर क्षेपणास्त्रे, हेलिकॉप्टर, रणगाडे आणि विमाने हल्ला करत आहेत, ज्यात आतापर्यंत 200 हून अधिक लोक मारले गेले आहेत. 
 
 मिळालेल्या माहितीनुसार कीवनंतर रशियाच्या सैन्याने खार्किवमध्येही हल्ले तीव्र केले आहेत. अनेक भारतीय विद्यार्थी सध्या येथे अडकले आहेत. गोळीबाराच्या वेळी ते त्यांच्या पालकांना आणि मित्रांना फेसबुकच्या माध्यमातून परिस्थितीची माहिती देत ​​आहेत. प्रसारमाध्यमंही त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र खराब नेटवर्कमुळे त्यांना अडचणी येत आहेत.
 
मीडिया रिपोर्ट्सनुसार, युक्रेनियन सैन्याने रशियन सैन्याला रोखण्यासाठी बुका आणि इरपिन शहरांमधील पूल उडवून दिला. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की म्हणाले की, रशियाकडून संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत मतदानाचा अधिकार काढून घ्यावा. रशिया नागरिकांवर हल्ले करत आहे, हे नरसंहार दर्शवत असल्याचे त्यांनी आपल्या व्हिडिओ संदेशात म्हटले आहे.
कीवच्या मध्यभागी किमान चार स्फोट ऐकू आले आणि रात्रभर हवाई हल्ल्याचे सायरन वाजले. मात्र, बुका येथे रशियन सैन्याला रोखण्यात आले आहे.
 
युक्रेनचे सर्वोच्च लष्करी कमांडर व्हॅलेरी झालुझनी यांनी फेसबुकवर सांगितले की, युक्रेनच्या हवाई दलाने बेलारूसहून कीवकडे डागलेले एक क्रूझ क्षेपणास्त्र पाडले. 
 
कीव प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, कीवच्या बाहेरील ट्रोश्चिना जिल्ह्यात 16 मजली इमारतीचा स्फोट झाल्याने सात गाड्यांना आग लागली. दोन डॅनिश पत्रकारांना ओकटिर्कामध्ये गोळ्या घालण्यात आल्या. त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती