साध्‍वी प्रज्ञाः एका अर्धवट स्‍वप्‍नांचा प्रवास

WDWD
साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर. गेल्‍या काही दिवसांपासून भारतीयच नव्‍हे तर विदेशी प्रसार माध्‍यमांमध्‍येही चर्चिले जाणारे नाव. आजवर ज्ञात असलेली पहिली संशयित हिंदू दहशतवादी महिला. कट्टर हिंदुत्‍ववादी विचारांची प्रज्ञासिंह आज सर्वांच्‍या चर्चेचा विषय ठरलीय ते मालेगावच्‍या स्‍फोटात संशयित आरोपी म्‍हणून. प्रखर राष्‍ट्रवादी विचार आणि शब्‍दांना आणि परखड वक्‍तृत्‍वशैली असलेली ही साध्‍वी संन्‍यास स्‍वीकारण्‍यापूर्वी भाजपच्‍या माध्‍यमातून विधानसभेवर जाण्‍यास इच्छुक होती. मात्र तिच्‍यातल्‍या जहाल हिंदुत्ववादी विचारांमुळे तिला तुरुंगात आणून पोचविले. संन्‍यास घेण्‍यापूर्वी मध्यप्रदेशातील एका भाजपच्‍या नेत्‍यासोबत प्रज्ञाचे प्रेमही जुळले होते. मात्र दुर्दैवाने ते यशस्‍वी होऊ शकले नाही आणि त्‍यानंतर तिने संन्‍यास स्‍वीकारला.

जूडो-कराटेत तरबेज: प्रज्ञाच्‍या आयुष्‍याची जितकी पाने उलटली तितक्‍या नवीन गोष्‍टी समोर येतात. एका अपूर्ण राहिलेल्‍या स्‍वप्‍नांचा प्रवास म्‍हणजेच प्रज्ञा. भाजपच्‍या वरिष्‍ठ नेत्‍यांनी आपला प्रज्ञाशी काहीही संबंध नसल्‍याचे सांगितले, असले तरीही तिचे भाजपसोबत जुने संबंध आहेत. हे अनेकदा सिध्‍द झाले आहे.

मूळची मध्‍यप्रदेशातील भिंड जिल्‍ह्यातल्‍या लहार या गावात जन्‍मलेली आणि मोठी झालेली प्रज्ञा लहानपणापासूनच अभ्‍यासात प्रचंड हुशार आहे. शालेय जीवनात ज्‍युदो आणि कराटेंमध्‍ये तरबेज असलेली प्रज्ञा इतर खेळांमध्‍येही तरबेज आहे. तिने खेळांमध्‍ये अनेक पदक व करंडक पटकाविले आहेत. महाविद्यालयीन जीवनात मुलींची छेड काढणा-या अनेकांना तिने धूळ चारली आहे.

पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्‍यानंतर तिने बी.पीएड. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. तिचे वडील ठाकूर चंद्रपालसिंह हे देखिल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनेक वर्षांपासूनचे कार्यकर्ते असून आयुर्वेदिक पद्धतीने उपचार करणारे वैद्य आहेत. लहार या गावाच्‍या नगर कार्यवाह पदाची जबाबदारीही त्‍यांनी संघात असताना सांभाळली आहे. चार बहिणी आणि एक भाऊ असलेली प्रज्ञा सर्वांत मोठी होती.

अभाविपची पूर्ण वेळ कार्यकर्तीः घरातूनच संघाच्‍या विचारांचे संस्‍कार असल्‍याने शैक्षणिक जीवनात ती अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्‍या संपर्कात आली. लहार गाव सोडून ती भोपाळला आली. तेथे पूर्णवेळ कार्यकर्ती म्‍हणून काम करताना ती विद्यार्थी परिषदेची संघटन मंत्री होती. उज्जैनमध्‍येही तिने काही दिवस अभाविपचे काम केले. 1992 ते 1997 पर्यंत ती विद्यार्थी परिषदेत होती.

राजकीय महत्‍वाकांक्षाः विद्यार्थी संघटनेच्‍या माध्‍यमातून काम करताना त्‍यातून विकसीत झालेल्‍या नेतृत्‍व गुणाचा फायदा प्रज्ञाने करून घेतला. 1997 मध्‍ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काम सोडल्‍यानंतर तिने भाजपमध्‍ये सक्रीय काम सुरू केले. 1998 मध्‍ये विधानसभा निवडणुकींपूर्वी भिंड जिल्‍ह्यातील मेहगावमधून उमेदवारी मिळविण्‍यासाठीही प्रयत्‍न केले. 1999 मध्‍ये तिने 'जय वंदे मातरम' या संघटनेचे काम सुरू केले.
  प्रज्ञाने संन्यास स्‍वीकारल्‍यानंतर तिचे नाव बदलून साध्वी पूर्णचेतनानंदगिरी झाले. मात्र संन्‍यास स्‍वीकारल्‍यानंतरही तिला या सांसारिक संकटांचा सामना करावाच लागला आणि मालेगावमध्‍ये गेल्‍या 29 सप्‍टेंबरला झालेल्‍या बॉम्‍बस्‍फोटप्रकरणी तिला अटक करण्‍यात      


या सर्व प्रवासात तिचे भाजपच्‍या एका तरुण नेत्‍यासोबत प्रेमही जुळले मात्र त्‍यात अपयश आल्‍यानंतर तिने पुन्‍हा लग्‍नाचा विचार न करता सन्‍यास स्‍वीकारण्‍याचा निर्णय घेतला आणि म्‍हणून जूना आखाड़ाच्‍या पीठाधीश्वर स्वामी अवधेशानंद यांचे शिष्‍यत्व स्‍वीकारून तिने 2006 मध्‍ये संन्यास स्‍वीकारला. त्‍यानंतर एक जहाल प्रवचनकार म्‍हणून तिने आपली ओळख निर्माण केली. साध्‍वी प्रज्ञा यांचे प्रवचन साध्वी ऋतंभरा यांच्‍या सारखेच जहाल असते.

वेबदुनिया वर वाचा