वरळी हिट अँड रन प्रकरण : शिवसेनेकडून राजेश शहा यांची शिवसेना उपनेतेपदावरून हकालपट्टी

बुधवार, 10 जुलै 2024 (21:33 IST)
मुंबईतील वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाह याचे वडील राजेश शहा यांना शिवसेनेने उपनेतेपदावरून हटवले आहे.वरळी हिट अँड रन प्रकरणात राजेश शहा यांनी आपल्या मुलाला मदत केल्या प्रकरणी कठोर भूमिका घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहा यांना उपनेतेपदावरून हटवण्याचे आदेश दिले.
 
मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार राजेश शहा यांची शिवसेना उपनेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. राजेश शहा हे शिवसेनेच्या शिंदे गटात उपनेते होते आणि ते पालघरमध्ये पक्षाच्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडत होते.

राजेश शहा यांच्या मुलाने मिहीर शाहने रविवारी दुचाकी वरून जात असलेल्या दाम्पत्याला आपल्या बीएमडब्ल्यू कार ने उडवले त्यात महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी मिहीर शाह ने तिथून पळ काढला.  आपल्या मुलाला वाचवण्यासाठी राजेश शहा यांनाही या प्रकरणात अटक करण्यात आली होती, मात्र न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. आता याप्रकरणी पक्षाने त्यांच्यावर कारवाई केली आहे.
 
मुंबई पोलिसांनी वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीरच्या कुटुंबीयांचा जबाब नोंदवला आहे. मंगळवारी मिहीरला अटक केल्यानंतर गुन्हे शाखेने रात्री उशिरापर्यंत त्याची आई, दोन बहिणी आणि मित्राचे जबाब नोंदवले. अपघाताच्या वेळी तो बीएमडब्ल्यू चालवत असल्याची कबुली मिहीर शाह यांनी दिली. 
 
Edited by - Priya Dixit 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती