वरळी हिट अँड रन प्रकरण:आरोपी मिहीरशाहला मुंबई न्यायालयाने 16 जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली

बुधवार, 10 जुलै 2024 (18:01 IST)
वरळी हिट अँड रन प्रकरणात मुख्य आरोपी मिहीर शाह ला मुंबई न्यायालयाने 16 जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मिहीर ला काल मुंबई पोलिसांनी अटक केली होती.आरोपीने वेगाने गाडी चालवत एका दुचाकीवर जात असलेल्या दाम्पत्याला जोरात धडक दिली. त्यात पती जखमी झाला तर पत्नीचा मृत्यू झाला.अपघातानंतर आरोपी पसार झाला.रविवारी सकाळी पहाटे 5:30 वाजता हा अपघात घडला. 

या प्रकरणात आरोपीच्या वडिलांनी राजेश शहा यांनी आरोपीला पळून जाण्यात मदत केली. आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या वाहनाला हटवण्याचा प्रयत्न केला.मिहीरला अटक करण्यासाठी पोलिसांनी 11 पथके तयार केली असून तपासात गुन्हे शाखेचा समावेश करण्यात आला.मिहीरला काल अटक केली आहे. 

या प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी सांगितले दोषी कोणी असेल त्याला सोडणार नाही. त्याच्यावर कडक करवाई केली जाणार. आम्ही पीडित कुटुंबाच्या पाठीशी उभे आहोत. पीडित कुटुंबियांना कायदेशीर आणि आर्थिक मदत करण्यात येईल. आरोपी मिहीर शाहचे वडील राजेश शहा हे पालघर जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते आहे. या प्रकारणांनंतर पक्ष कडून त्यांची उपनेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आली. 
 
Edited by - Priya Dixit   
 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती