धरणगाव शहरातील एका भागात 26 वर्षीय महिला आपल्या पती व मुलासह वास्तव्याला आहे. त्याच परिसरात राहणारा संशयित आरोपी भुषण सुकलाल महाजन याने महिलेचा अंघोळ करताना व्हिडीओ काढून तो व्हिडीओ व्हायरल करण्याची आणि मुलगा आणि पतीला जीवेठार मारण्याची धमकी देत तिच्याच घरात घुसून अत्याचार केला. जून 2023 ते 16 डिसेंबर 2023 दरम्यान त्याने 3 ते 4 वेळा महिलेवर अत्याचार केला. या अत्याचाराला कंटाळून महिलेने धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार 8 जानेवारी रोजी रात्री 11 वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात संशयित आरोपी भूषण महाजन याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार हे करीत आहे.