मिळालेल्या माहितीनुसार, आरतीचे काही वर्षांपूर्वी लग्न झाले होते. पण कौटुंबीक कारणांवरुन तीने पतीला सोडून दिले होते. ती आपल्या मुलांसोबत दुसरीकडे राहत होती. याच कालावधीत आरतीची श्याम पवार नावाच्या व्यक्तीची ओळख झाली. सुरुवातीला मैत्री त्यानंतर हळूहळू या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर आरती आपल्या मुलांसह श्यामसोबत कस्तुरबा नगरमध्ये राहू लागली.
हे ही वाचा: दुर्दैवी: नाशिकला आठ वर्षाच्या बालकाचा पाण्यात बुडून मृत्यू
श्याम आणि आरती यांच्यामध्ये सतत काहीना काही कारणांवरुन वाद होत होते. अशातच मंगळवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास श्यामने घरी असताना आरतीच्या मुलाला चापट मारली. त्यातून आरतीने श्यामला विचारणा केली असता दोघांत भांडण झाले. या भांडणावेळी संतप्त झालेल्या श्यामने रागाच्या भरात किचनमधील धारदार सुरी आरतीच्या पाठीत खुपसली.
हे ही वाचा: नाशिक: अंबडला आर्थिक देवाण घेवाणीच्या वादातून युवकाचा खुन
तर पोस्टमॉर्टम अहवालामध्ये आरतीचा मृत्यू नैसर्गिकरित्या झालेला नसून तिची हत्या झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी तिच्या लिव्ह इन पार्टनर श्यामला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने आरतीची हत्या केल्याची कबुली दिली. पोलिसांनी श्यामला अटक केली असून याप्रकरणाचा तपास सुरु आहे.