मिळालेल्या माहितीनुसार डोंबिवली पूर्व च्या पांजुरंग वाड़ी मध्ये यशवंत धोत्रे नावाचा एक व्यक्ती राहतो. जो झोमॅटो कंपनीमध्ये डिलिवरी बॉय चे काम करतो. काळ संध्याकाळी तो एका इमारतीच्या सहाव्या मजल्यावर पार्सल देण्यासाठी गेला होता. याचा दरम्यान एक महिला डॉक्टर इमारतीच्या सातव्या मजल्यावर फिजियोथेरेपीसाठी गेली होती. महिला डॉक्टर लिफ्ट मधून खाली उतरत होती. तेव्हा हा डिलीवरी बॉय ज्याचे नाव यशवंत धोत्रे आहे, तो लिफ्टची वाट पाहत होता. तसेच लिफ्ट आल्यावर चढला. लिफ्ट जशी ग्राउंड फ्लोरसाठी सुरु झाली, या व्यक्तीने महिला डॉक्टरसोबत अश्लील वर्तणूक केली. लिफ्ट थांबल्यानंतर त्याला पकडण्याचा प्रयत्न केला पण तो फरार झाला.