लग्नानंतर महिनाभरातच नवरीने पूजेचे पैसे घेऊन ठोकली धूम

बुधवार, 20 ऑक्टोबर 2021 (08:22 IST)
लग्नाला महिना पूर्ण होताच नवरीने घरातून पलायन केल्याची घटना एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. पलायन करतांना सत्यनारायण पूजेसाठी घरात ठेवलेले सहा हजार रुपये व मोबाईल घेऊन पळाली. या बाबत तरुणाने डोक्याला हात मारून घेत लग्न जुळवून देणाऱ्या महिलेविरुध्द्व कारवाईसाठी पोलिसात धाव घेतली आहे.
 
सदर तरुणाचे लग्नच जुळत नव्हते. कालका माता मंदिर परिसरात राहणाऱ्या एक महिलेने माझ्या नात्यातील व ओळखीची मुलगी असल्याचे सांगून ती गरीब घरची असून लग्नाच तयार आहे. पण त्यासाठी लग्नाचा खर्च वरपक्षाने करावा, असे सांगत त्याची पूर्तता करून हे लग्न जुळवून आणले होते. त्यासाठी १ लाख १५ हजार रुपये या महिलेच्या माध्यमातून देण्यात आले. तिच्या सांगण्यावरून २ जुलै २०२१ रोजी सम्राट कॉलनीत लग्नही झाले. १० आगस्ट २०२१ रोजी सकाळी ११ वाजता नवरा व सासरे कामावर तर सासू किचनमध्ये स्वयंपाक करीत असताना  शौचास जाऊन येते, असे सांगून नवविवाहित पसार झाली, ती पुन्हा परतलीच नाही. त्यानंतर तिचा पती, सासरांनी  सर्वत्र शोध घेतला. तिच्या मानलेल्या भावाला फोन करून विचारले. मात्र, ती कूठेच आढळून आली नाही.
 
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच नवऱ्याने एमआयडीसी पोलीस ठाणे गाठले. तेथे पत्नी हरविल्याची तक्रार नोंदविण्यात आली. मात्र, गुन्हा दाखल करून घेण्यात आला नाही. २१ सप्टेंबर २०२१ रोजी पोलीस अधीक्षक यांची प्रत्यक्ष भेट घेऊन तक्रार दाखल करून घेण्याबाबत विनंती केली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती