मग आम्हाला पक्षात पुन्हा, पुन्हा बोलवताय कशाला : शहाजी बापू पाटील

मंगळवार, 2 ऑगस्ट 2022 (15:13 IST)
सांगोल्याचे शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटलांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे. “आम्ही गद्दार, गटारीची घाण आहे तर आम्हाला पक्षात कशाला बोलवताय, असं ते म्हणालेत. आदित्य ठाकरे यांनी शिवसंवाद यात्रा काढली आहे. त्या माध्यमातून ते आम्हाला खूप टाकून बोलत आहेत. सातत्याने आम्हाला गद्दार, गद्दार म्हणताहेत, गटार आहे वाहून जाऊ द्या म्हणत आहेत. मग ठीक आहे तुमच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही गद्दार आहोत, गटारीची घाण आहोत तर मग आम्हाला पक्षात पुन्हा, पुन्हा बोलवताय कशाला”, असं शहाजी बापू पाटील म्हणालेत.
 
“आदित्य ठाकरे यांनी शिवसंवाद यात्रा काढली आहे त्या माध्यमातून ते आम्हाला खूप टाकून बोलत आहेत, आम्हाला अपमानित करत आहेत. त्यामुळे शिंदे गटातील आमदार दुखावले जात आहेत. आम्हाला थेट गद्दार म्हणणं योग्य नाही. उलट आम्ही बाळासाहेबांचा विचार पुढे घेऊन जात आहोत. लोकांच्या  मनातील भावनेचा आदर करत आम्ही भाजपसोबत जात आहोत. त्यामुळे आम्ही काही चुकीचं करत आहोत, असं वाटत नाही, जनता आमच्या बाजूने आहे”, असं शहाजीबापू पाटील म्हणाले आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती