शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाचे ? शिवसेना संघर्षावर आज सुनावणी

सोमवार, 18 सप्टेंबर 2023 (13:23 IST)
Shivsena : आजचा दिवस महत्त्वाचा आहे. दिल्लीत आज सुप्रीम कोर्टात आज शिवसेनेच्या दोन मोठ्या सुनावण्या बाबत निर्णय येणार आहे. शिवसेना आणि धनुष्य बाण चिन्ह कोणाचे यावर आज लक्ष लागले आहे. आज या निर्णयावर सुनावणी होणार आहे. 
 
सर न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचे खंडपीठ सुनावणी करणार आहे. ठाकरे गटाने निवडणूक आयोग आणि 16 अपात्र आमदारांच्या अपात्रते बद्दल सुप्रीम कोर्टात दोन याचिका दाखल केल्या आहे. तर ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांनी या बाबत पुनर्विचार याचिका दाखल केली. आज त्या पुनर्विचार याचिकेवर सुनावणी होणार आहे. 
तसेच निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली असून त्याच्यावर देखील आजच सुनावणी होणार आहे. 
 
 
 Edited by - Priya Dixit 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती