रिक्षावाल्याकडे कोट्यवधी रुपये कुठून आले? - चंद्रकांत खैरे

रविवार, 24 जुलै 2022 (10:57 IST)
एका रिक्षावाल्याकडे एवढे कोट्यवधी रुपये कुठून आले? असा प्रश्न औरंगाबादचे शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी उपस्थित केला. त्यांच्या टीकेचा निशाणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे होते. 

खैरे पुढे म्हणाले की, "आमच्या सर्व कार्यकर्त्यांमागे ईडी लावता. मला एक आश्चर्य वाटतं 1988 च्या नंतर एक रिक्षावाला एवढे कोट्यवधी रुपये कसे जमा करु शकतो?"
 
युवासेना प्रमुख आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे सध्या बंडखोर आमदारांच्या मतदारसंघांचा दौरा करत आहेत. या दौऱ्याअंतर्गत ते दोन दिवस औरंगाबादमध्ये होते. त्यावेळी त्यांनी विविध ठिकाणी सभा घेतल्या.
 
यातील एका सभेत बोलताना चंद्रकांत खैरे म्हणाले, "आदित्यसाहेब, आपण आता ज्या मार्गाने आलात त्यावर किती लोक थांबले होते हे आपण पाहिलं असेल. ठाकरे बाहेर पडले की लगेच वलय निर्माण होतं."

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती