कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमांवर देशभरातील शेतकऱ्यांकडून आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाबाबत बॉलिवूड आणि क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांकडून एकाचवेळी एकाच भाषेत ट्विट करण्यात आले. यामध्ये भारतरत्न सचिनत तेंडुलकरचाही समावेश होता. आमचा अंतर्गत मामला असल्याचे सांगत सार्वभौमत्वावर तडजोड होऊ शकत नाही अशा प्रकारचे ट्विट सचिनने केल्यानंतर चांगलीच टीका झाली.