न्याय २०२४ च्या अगोदर मिळावा एवढी नक्कीच अपेक्षा - सुषमा अंधारे

बुधवार, 18 जानेवारी 2023 (08:50 IST)
धनुष्यबाण चिन्हाबाबत पुढील सुनावणी शुक्रवारी २० जानेवारी होणार आहे. दोन्ही गटाचे युक्तीवाद ऐकूण घेतल्यानंतर निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे. शिवसेना नेमकी कुणाची? याबाबत आज निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू होती. शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांकडून या सुनावणीसाठी जोरदार तयारी करण्यात आली होती. मात्र यावर आज निर्णय होऊ शकला नाही. निकाल लागण्यास विलंब होत असल्यावरून शिवसेना (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया देताना नाराजी व्यक्त केली.
 
सुषमा अंधारे म्हणाल्या, “एका पाश्चात्य विचारवंताने एक फार चांगलं म्हटलेलं आहे, की उशीरा न्याय मिळणे हा सुद्धा अन्यायच असतो. ज्या पद्धतीने तारखा पडत आहेत. न्यायालयीन प्रक्रियेचा आम्ही आदर करतो. परंतु तो न्याय २०२४ च्या अगोदर मिळावा एवढी नक्कीच अपेक्षा आहे. त्याला इतका उशीर होऊ नये की तोपर्यंत अवैध मार्गाने का होईना सत्ताधाऱ्यांनी सत्ता भोगून घ्यावी.”
 
 Edited By- Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती