ॲक्शनला आम्ही रिॲक्शन देऊ शकतो तसेच आमचे हात बांधलेले नाहीत : प्रवीण दरेकर

शनिवार, 23 एप्रिल 2022 (15:21 IST)
राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे. कायदा हातात घेण्याचे काम ज्या पक्षाचे सरकार आहे तोच पक्ष घेत आहे. गेल्या आठवड्यापासून राज्यात सरकारच्या मार्गदर्शनाखाली उच्छाद मांडण्यात आला आहे. सुरुवात चेंबूरला झाली. आमदार प्रसाद लाड यांच्या नेतृत्वात पोलखोल अभियान होणार होती. त्यांच्या पोलखोल अभियान रथाची तोडफोड करण्यात आली. राणा दाम्पत्याच्या घरासमोर शिवसैनिकांना सोडण्यात आले आहे. भाजप सगळ्या घटनांवर नजर ठेवून आहे. ॲक्शनला आम्ही रिॲक्शन देऊ शकतो तसेच आमचे हात बांधलेले नाहीत असा स्पष्ट इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेनाला दिला आहे.
 
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील सर्वच घडमोडींवरुन ठाकरे सरकारवर निशाणा केला आहे. शिवसेनेच्या आणि युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक करुन पोलखोल होऊ नये यासाठी दहशत निर्माण केली आहे. पोलखोल अभियानाच्या रथाची तोडफोड करण्यात आली. गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता परंतु दोन दिवसानंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अद्याप फरार आहेत. कांदिवलीत अतुल भातखळकर यांच्या इथे सभा असताना स्टेज तोडण्याचा प्रयत्न झाला. दहिसरलासुद्धा तसेच झाले. गिरगावमध्ये पोलखोलची सभा असताना दंगा करण्याचा प्रयत्न झाला असे प्रवीण दरेकरांनी सांगितले.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती