आम्ही महाविकास आघाडीसोबतच आहोत, अशोक चव्हाण यांची स्पष्टोक्ती

सोमवार, 4 जुलै 2022 (14:54 IST)
शिंदे सरकारच्या बहुमत चाचणीवेळी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण , माजी मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यासह अनेक आमदार गैरहजर होते. ते दोघेही 11 वाजता विधानसभेचे दरवाजे बंद झाल्यानंतर विधिमंडळ सभागृहात पोहोचले. दरम्यान माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण वेळेत न पोहोचल्याने आश्चर्य व्यक्त केले गेले.  या सोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप आणि अण्णा बनसोडे हे वेळेवर पोहोचले नाहीत. यापूर्वी काँग्रेसचा एक गट फुटून भाजप सोबत जाईल अशी चर्चा होती. मात्र, आम्ही महाविकास आघाडीसोबतच आहोत, अशी स्पष्टोक्ती काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी दिली. त्यांनी सभागृहाबाहेर माध्यमांशी संवाद साधला.
 
सभागृहातील प्रथेनुसार बहुमत चाचणीआधी चर्चा होते. आम्हाला यायला दोन ते तीन मिनिटे उशीर झाला. सभागृह सुरू होणार तेवढ्यात आम्ही लॉबीमध्ये पोहोचलो होते. मात्र, दार बंद झाले. त्यामुळे आम्हाला सभागृहात येता आले नाही, असं अशोक चव्हाण म्हणाले.
 
उशीर झाल्यामुळे आम्ही बहुमत चाचणीत मत देऊ शकलो नाही, त्यामुळे यातून कोणताही राजकीय अर्थ काढू नका, असंही अशोक चव्हाण म्हणाले. ते म्हणाले की, आम्ही महाविकास आघाडीसोबतच आहोत. म्हणूनच कालच्या विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीत आम्ही महाविकास आघाडीसाठी मतदान केलं. त्यामुळे आजच्या प्रकाराबाबत कोणताही राजकीय अर्थ न काढण्याचं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.
 
काँग्रेसचे अनुपस्थित आमदार  –
 
1.     अशोक चव्हाण, काँग्रेस
2.     विजय वडेट्टीवार, काँग्रेस
3.     प्रणिती शिंदे, काँग्रेस
4.     झीशन सिद्दिकी, काँग्रेस
5.     धीरज देशमुख, काँग्रेस
6.     अण्णा बनसोडे, राष्ट्रवादी
7.     संग्राम जगताप, राष्ट्रवादी
8.     जितेश अंतापुरकर, काँग्रेस
9.     कुणाल पाटील, काँग्रेस
10.मुक्ता टिळक, भाजप (आजारी)
11.लक्ष्मण जगताप, भाजप (आजारी)
12.नवाब मलिक, राष्ट्रवादी (जेलमध्ये)
13.अनिल देशमुख, राष्ट्रवादी (जेलमध्ये)
14.मुफ्ती इस्माईल, एमआयएम
15.निलेश लंके, राष्ट्रवादी
16.दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादी
17.दिलीप मोहिते, राष्ट्रवादी
18.राजू आवळे, काँग्रेस
19.मोहन हंबर्डे, काँग्रेस
20.शिरीष चौधरी, काँग्रेस

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती