शिंदे 49 आमदारांसह दिसले; राऊत म्हणाले- शिवसेना युती सोडण्यास सहमत, मुंबईत येऊन चर्चा करा

गुरूवार, 23 जून 2022 (15:52 IST)
महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार पडणे आता जवळपास निश्चित झाले आहे. गुवाहाटीत एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 42 आणि 7 अपक्ष आमदारांसोबतचे फोटो प्रसिद्ध करून शक्ती दाखवली आहे. यानंतर शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले- आम्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबतची युती तोडण्यास तयार आहोत. फक्त शिंदे मुंबईत या आणि उद्धव यांच्याशी बोला.
 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र भाजपमध्येही सरकार स्थापनेबाबत आणि पुढील प्रक्रियेबाबत बैठक सुरू झाली आहे. भाजपने शिंदे यांना महाराष्ट्र मंत्रिमंडळात 8 कॅबिनेट रँक आणि 5 राज्यमंत्रिपदाची ऑफर दिली आहे. यासोबतच केंद्रात दोन मंत्रीपदेही देऊ करण्यात आली आहेत.
 
"जे आमदार महाराष्ट्राच्या बाहेर आहेत, त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे. महाविकास आघाडीतून बाहेर पडायला हवं, एक वेगळा विचार करायला पाहिजे, अशी या सर्व आमदारांची इच्छा असेल तर त्यांनी आधी मुंबईत यावं. शिवसेना प्रमुखांसोबत बोलावं. त्यांच्यापुढे ती मागणी मांडावी. तिथं बसून पत्रव्यवहार करू नये. त्यांच्या मागणीचा नक्की विचार केला जाईल," असं संजय राऊत यांनी म्हटलंय.
 
महाविकास आघाडीतून बाहेर पडू, पण त्यासाठी आमदारांना 24 तासात परत यावं लागेल, असं राऊत म्हणालेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती