कोयना धरणातील पाणी प्रकल्पासाठी वळवावे; मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मंगळवार, 24 मे 2022 (21:36 IST)
रिफायनरी प्रकल्पासाठी जोरदार मोर्चेबांधणी
रत्नागिरी : कोकणातील रिफायनरीबाबत आता काही सकारात्मक हालचाली होताना दिसत आहेत. परंतु, शिवसेनेची भूमिका अद्याप देखील स्पष्ट नसल्याने लोकप्रतिनिधींमध्ये संभ्रम आहे. पण, त्याचवेळी शिवसेनेचे स्थानिक अर्थात राजापूर-लांजा या विधानसभा मतदारसंघातील आमदार राजन साळवी  यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  पत्र लिहिले आहे. त्या पत्रामध्ये त्यांनी कोयना धरणातील पाणी रिफायनरी प्रकल्पासाठी वळवावे, अशी मागणी केली आहे.
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यानी कोकणातील लोकप्रतिनिधींची बैठक घेतली होती. त्यावेळी हे पत्र दिल्याची माहिती आमदार राजन साळवी यांनी दिली. त्यामुळे सध्या रिफायनरी प्रकल्पासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली जात असल्याचं समोर येत आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती