मान्सूनच्या सक्रियतेमुळे महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. गेल्या 24 तासांत मुंबई आणि उपनगरात पावसाचा जोर वाढला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला असून शनिवारी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
हवामान विभागानुसार, मुंबईत आज मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबईसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. मुबंईत 2 ते 3 दिवस हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट आणि यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर घाट भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
त्याचबरोबर विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील तीन दिवस मराठवाड्यातील विविध भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
7 जुलै ते 11 जुलै या कालावधीत मुंबई, ठाणे आणि उपनगरात चांगला पाऊस पडेल, असे संकेत हवामान खात्याने दिले आहेत.शनिवारी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होईल, त्यामुळे पुढील आठवड्यात मुंबईत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यात मुंबईत 2-3 दिवसांत सुमारे 200 किमी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
जुलैमध्ये देशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. IMD ने ईशान्य भारतात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. ईशान्य भारतातील अनेक भाग आणि वायव्य, पूर्व आणि आग्नेय द्वीपकल्पीय भारतातील काही भाग वगळता देशातील बहुतांश भागात सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.