मिळालेल्या माहितीनुसार विनायक मेटे हे मराठा आरक्षणासंदर्भात आयोजित बैठकीसाठी मुंबईच्या दिशेने येत होते. पुणे-मुंबई एक्स्प्रेसवरून कारमधून मुंबईच्या दिशेनं येत असतानाच पहाटे साडे पाच वाजता विनायक मेटे यांच्या कारला विनायक मेटे यांच्या कारला अज्ञात वाहनाने धडक देऊन माडप बोगद्यात भीषण अपघात झाला.कार अपघातात विनायक मेटे यांच्या डोक्याला, मानेला आणि पायाला जबर मार लागला होता.
या भीषण दुर्घटनेत विनायक मेटे हे गंभीर जखमी झाले. तसेच त्यांच्यासोबत असलेल्या सुरक्षा रक्षकालाही जबर मार लागला. अपघातानंतर विनायक मेटे यांना तातडीने पनवेलच्या कामोठे येथील एमजीएम (महात्मा गांधी मिशन) रुग्णालयात विनायक मेटे यांची प्रकृती गंभीर असल्यानं त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं होतं. उपचार सुरू असतानाच विनायक मेटे यांनी अखेरचा श्वास घेतला.