जादूटोण्याच्या संशयावरून गावकऱ्यांनी 2 जणांना जिवंत जाळले,आरोपींना अटक

Webdunia
शनिवार, 4 मे 2024 (23:27 IST)
महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात बारसेवाडा गावात जादू-टोण्याच्या संशयावरून एका महिलेसह दोघांवर लोकांनी हल्ला करत त्यांना जिवन्त जाळण्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी 15 जणांना अटक केली आहे. 

सदर प्रकरण आरोही बंडू तेलमी या साडेतीन वर्षाच्या मुलीचा मृत्यू काळ्या जादूमुळे झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून सदर महिला आणि आणि इतर दोघे काळा जादू करण्याचा संशय होता. मुलीच्या मृत्यूमुळे संतप्त ग्रामस्थांनी महिला आणि इतर दोघांना मारहाण केली आणि त्यांना पेटवले. या घटनेत जमनी देवजी तेलमी आणि देशु कटिया अटलमी यांचा मृत्यू झाला.  

घटनेची माहिती  मिळतातच पोलीस अधिकारीघटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तपास करून आरोपीना अटक करण्याचे आदेश दिले. पोलिसांनी या प्रकरणी 15 जणांना अटक केली आहे.  
 
Edited By- Priya Dixit   
 
 

संबंधित माहिती

पुढील लेख