मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा नियोजित परदेश दौरा रद्द करण्यात आला आहे. घाना या देशात पार पडणाऱ्या 66 व्या राष्ट्रकुल संसदीय परिषदेस राहुल नार्वेकर हजेरी लावणार होते. पण आता अचानक हा दौरा रद्द झाल्याचं सांगण्यात आलंय. हा दौरा रद्द होण्यामागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या अफिडेव्हिटनंतर नार्वेकरांनी हा दौरा रद्द केल्याची चर्चा आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे 30 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबर या काळात आफ्रिकेतील घाना या देशाच्या दौऱ्यावर जाणार होते. पण याच दरम्यान, म्हणजे ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेवर अध्यक्ष वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप करणाऱ्या याचिकेसंबंधित सुनावणी होणार होती.