शिवसेना आमदार अपात्रेची पुढील सुनावणी 13 ऑक्टोबरला होणार आहे. विधानसभा अध्यक्षांसमोर दोन्ही बाजूच्या वकिलांनी युक्तीवाद मांडला. यामध्ये सुप्रीम कोर्टाने दिलेल्या डायरेक्शननुसार शेड्युलनुसार सुनावणी होणार का याबाबत चर्चा झाली.दोन्ही गटाचा युक्तीवाद ऐकून निर्णय राखून ठेवल्याचे शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. पुढील वेळापत्रक ठरवण्यासाठी निर्णय राखून ठेवल्याचेही त्यांनी सांगितले.
मागील सुनावणीत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सुनावणीला उशीर होत असल्याच्या कारणावरुन सुप्रिम कोर्टानं फटकारत नाराजी व्यक्त केली होती. त्यानुसार आज दुपारी सुनावणी पार पडली. मात्र या प्रक्रियेला तीन महिन्यांचा अवधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळं आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल पुढील वर्षी लागेल असं अनेकांच म्हणणं आहे.