वसंत मोरे यांची पोस्ट चर्चेत महिलांच्या हाती असलेल्या कोयत्याचे रहस्य उलगडले

शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2023 (21:25 IST)
सकाळी जीमला जात असताना अचानक समोर तीन महिला हातात काेयता घेतलेल्या दिसल्या. मनात आले की इतेक आमचे पुणे असुरक्षित झाले का ? या वसंत मोरे यांच्या फेसबुक पोस्टची सध्या सोशल मिडियावर जोरदार चर्चा झाली आहे. महिलांच्या हाती असलेल्या कोयत्याचे रहस्यही त्यांनी पोस्टच्या माध्यमातून उलगडले आहे.
 
या फेसबुक पोस्टमध्ये वसंत मोरे म्हणतात की, सकाळी जीमला जात असताना अचाकन समोर तीन महिला हातात कोयता घेतलेल्या दिसल्या. मनात आले की, इतेक आमचे पुणे असुरक्षित झाले का ?, की माॅर्निंग वाॅकला जाणाऱ्या महिला कोयते घेऊन फिरू लागल्या आहेत. मी थोडा त्यांच्या मागे गेलो, तर त्या जनावरांसाठी चारा गोळा करत होत्या. पण, मागील आठवड्यात आमच्या कात्रज गावठाणमद्ये सकाळी सहा वाजता भर रस्त्यावर एका महिलेचे मंगळसूत्र चोरून चोरट्याने चक्क पळ काढला. जर पोलिसांनी चोरट्यांवर कडक कारवाई केली नाही, तर महिलांच्या हाती कोयता असलेले चित्र दिसले तर नवल वाटून घेऊ नका.
 
 
Edited By- Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती