मिळालेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेश सरकारने उत्तर प्रदेशातील नेपाळ सीमेजवळ बेकायदेशीरपणे बांधलेल्या धार्मिक स्थळांवर कारवाई केली आहे. यूपी सरकारने याबाबत एक निवेदनही जारी केले आहे. यामध्ये नेपाळच्या सीमेवरील जिल्ह्यांमध्ये सरकारी आणि खाजगी जमिनींवर बेकायदेशीरपणे बांधलेल्या धार्मिक स्थळांवर कारवाई करण्यात आली. गेल्या काही दिवसांत शेकडो मदरसे, मशिदी, धार्मिक स्थळे आणि ईदगाह ओळखण्यात आले आहेआणि त्यांना सील करून पाडण्याची कारवाई करण्यात आली आहे. राज्य सरकारने जारी केलेल्या निवेदनानुसार, ही कारवाई मुख्यमंत्री योगी यांच्या सूचनेनुसार करण्यात आली आहे.