माविआची आज उद्धव ठाकरेंच्या घरी तातडीची बैठक

बुधवार, 28 ऑगस्ट 2024 (11:47 IST)
राज्यात वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यासंदर्भातील राजकारण आता तीव्र झाले आहे. महाविकास आघाडीने आज तातडीने उद्धव ठाकरे यांच्या घरी दुपारी 12 वाजता बैठक बोलावली आहे. 
 
या बैठकीला उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले यांच्यासह महाविकास आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत राज्याची सद्यस्थिती आणि निवडणुकीची रणनीती,सिंधुदुर्ग येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याची विटंबना , बदलापुरातील मुलींवर झालेले लैंगिक अत्याचार, रामगिरी महाराजांचे वादग्रस्त वक्तव्य, राज्यातील आंदोलन, राज्याची कायदा व सुव्यवस्था यावर सविस्तर चर्चा होणार असल्याचे बोलले जात असले तरी या बैठकीत जागावाटपाचा मुद्दाही गाजण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होणार असून तारखा अजून जाहीर झालेल्या नाहीत. निवडणुकीपूर्वी राजकीय हालचालींना वेग आला आहे.बैठकीची वेळ आज दुपारी 12 वाजता ठेवण्यात आली आहे. बैठकीसंदर्भात शरद पवार 12 वाजता उद्धव ठाकरेंच्या घरी मातोश्रीवर जाणार आहेत.
Edited by - Priya Dixit   
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती