मिळालेल्या माहितीनुसार ही घटना बुधवारी दुपारी जुन्नर शहरात घडली. या घटनेप्रकरणी पोलिसांनी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराम लांडे, त्यांचा मुलगा, डीजे साउंड सिस्टीम घेऊन जाणाऱ्या गाडीचा मालक आणि त्याचा चालक यांना अटक केली. लांडे यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मिरवणूक काढत असताना हा अपघात घडल्याचे त्यात म्हटले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ वर्षीय मृत तरुणाचे नाव आदित्य काळे असे आहे, जो मिरवणुकीदरम्यान झांजा वाजवणाऱ्या गटाचा भाग होता.
जुन्नर पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, "अपघातात काळे यांचा मृत्यू झाला आणि इतर सहा जण गंभीर जखमी झाले. घटनेनंतर, मिरवणुकीचे आयोजक देवराम लांडे आणि त्यांचा मुलगा घटनास्थळावरून पळून गेले. अधिकाऱ्याने सांगितले की, पोलिसांनी लांडे, त्यांचा मुलगा आणि इतर दोघांविरुद्ध बुधवारी रात्री गुन्हा दाखल केला आणि त्यांना अटक केली.