मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गेल्या वर्षी सुरू करण्यात आली होती आणि जुलै २०२५ पर्यंत पात्र महिलांच्या खात्यात एकूण १९,५०० रुपये जमा करण्यात आले आहेत. तर ऑगस्ट महिन्यासाठी १५०० रुपये जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
खरंतर, ऑगस्ट महिना उलटून गेला आणि सप्टेंबरचे ११ दिवस उलटून गेले तरी लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे आलेले नाहीत, त्यामुळे लाभार्थी चिंतेत आहे. पण आता महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्वतः १४ व्या हप्त्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी दिली आहे. त्यांनी काही काळापूर्वी 'एक्स' वर पोस्ट करून सांगितले होते की ऑगस्ट महिन्यासाठी सन्मान निधी वाटप करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या, "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याची सन्मान रक्कम वाटप करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होत आहे. महाराष्ट्रातील माता आणि भगिनींच्या अढळ श्रद्धेने पुढे जाणारी ही सक्षमीकरणाची क्रांती यशस्वीरित्या मार्गावर आहे. लवकरच या योजनेतील सर्व पात्र महिलांच्या आधारशी जोडलेल्या बँक खात्यांमध्ये १५०० रुपयांचा सन्मान निधी जमा केला जाईल."