राज्यात पुन्हा अवकाळीचं संकट, या ठिकाणी मुसळधार अवकाळी पाऊस होणार

शनिवार, 11 मे 2024 (16:19 IST)
सध्या अनेक ठिकाणी उकाडा वाढत आहे. येत्या चार दिवसांत हवामान खात्यानं राज्यात मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला असून पुण्यासह राज्यातील या 16 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. राज्यात पुन्हा अवकाळीचं संकटाचा इशारा देण्यात आला आहे.

पुण्यातील  पिंपरी- चिंचवड मध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. या मुळे नागरिकांची तारांबळ उडाली. 
 
मध्य महाराष्ट्रावर वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाल्यामुळे अरबी समुद्रावरून बाष्पयुक्त वारे राज्याकडे येत आहे. उत्तरेकडून येणारे उष्ण वारे आणि स्थानिक तापमानाच्या वाढीमुळे वारे, मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होऊन पाऊस येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्रात मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  
 
पुणे, सांगली, सातारा, धाराशिव, सोलापूर, नांदेड, अकोला, हिंगोली, बुलढाणा, अमरावती, लातूर, वर्धा, नागपूर, वाशीम, चंद्रपूर, यवतमाळ, या जिल्ह्यांना हवामान खात्यानं यलो अलर्ट दिला आहे. 
 
राज्यात शुक्रवारी मराठवाडा, विदर्भ, दक्षिण मध्य, शनिवार पूर्व विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्र आणि रविवारी किनारपट्टी वगळता सर्व महाराष्ट्रात आणि सोमवार 13 मे रोजी विदर्भ, मराठवाडा, दक्षिण- मध्य महाराष्ट्रात यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर पुणे, शिरूर, मावळ, नगर, शिर्डी या भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

Edited by - Priya Dixit  
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती