सध्या देशात काही भागांत कोरडे वातावरण असून उष्णता वाढत आहे. तर काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागानुसार, हिमालयात सध्या थंड वारे वाहत आहे. वाऱ्याची चक्रीय स्थिती नैऋत्य राजस्थानकडे बनत आहे. ओडिशा पासून अरबी समुद्रापर्यंत एक द्रोणीका रेषा बनली आहे. या परिस्थितीमुळे राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
येत्या तीन दिवस शनिवार ते सोमवार अमरावती, भंडारा, यवतमाळ, गोंदिया या भागात मेघगर्जना सह विजांचा कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर ईशान्य मराठवाड्यात आणि विदर्भ भागात वातावरण ढगाळ राहील. अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.