केंद्रीयमंत्री नारायण राणेंच्या मागणीला केंद्रीय दूरसंचार मंत्र्यांची मंजूरी,सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी BSNL चे 103 टॉवर मंजूर

शुक्रवार, 13 जानेवारी 2023 (20:35 IST)
केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या मागणीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात 103 मोबाईल टॉवर पहिला टप्प्यात मंजूर करण्यात आले आहेत. केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 110 मोबाईल टॉवर मंजूर केले आहेत. त्यातील 103 टॉवर हे केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी मागणी केलेले आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील टेलिकम्युनिकेशनचे जाळे अधिक मजबूत होणार आहे.
 
केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांना नोव्हेंबर महिन्यात पत्र दिले होते. या पत्रात सिंधुदुर्ग जिल्ह्याची भौगोलिक स्थिती पाहता मोबाईल टॉवरची असलेली गरज लक्षात आणून दिली होती. त्यानुसार त्यांनी मागणी केलेल्या 103 टॉवरला मंजुरी मिळालेली आहे. 

Edited By-Ratnadeep Ranshoor
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती