चित्रा वाघ आणी उर्फी जावेद यांच्यात सुरु असलेला वाद शमण्याचे नाव घेत नाहीये. चित्रा वाघ यांच्या प्रत्येक हल्याला उर्फी समाज माध्यमाच्या माध्यमातून पोस्ट करत डिवचत आहे. दरम्यान आतापर्यंत चित्रा वाघ यांनी उर्फीच्या पोस्टवरून कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र तिच्या पोस्ट बद्दल विचारल्यावर चित्रा वाघ यांनी उत्तर दिले आहे.
उर्फीने “मेरी डीपी इतनी धासू, चित्रा मेरी सासू” अशा पद्धतीच्या एक ना अनेक पोस्ट करत चित्रा वाघ यांची खिल्ली उडवली होती. यावर त्यांना प्रश्न विचारला असता ते तुम्ही त्यांना विचारा मी हे समाजासाठी करत आहे. या विकृती हटल्या पाहिजेत यासाठी माझा लढा सुरु आहे. आज मुंबईत नंगानाच करतेय, उद्या बीडच्या चौकात करेल हे तुम्हाला मान्य आहे का? ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत हा नंगानाच चालणार नाही ही माझी भूमिका समाजस्वास्थ्याची आहे. हे राजकारण नाही. मला नोटीस पाठवली त्याचं दु:ख नाही. मी त्याला उत्तरही पाठवलं आहे. पण समाजस्वास्थ्यासाठी काम करणाऱ्या महिलेला घेरण्याचा प्रयत्न सुरु आहे. उद्या दुसरी महिला लढण्यासाठी कशी उभी राहिल? मला काहीही फरक पडत नाही, कुणी कितीही काहीही बोलू द्या. हा नंगानाच चालू देणार नाही असा हल्ला केला आहे.
“इथे धर्माचा विषय नाही.. हे नागडे नाच आपल्याला मान्य आहेत का? असे प्रश्न चित्रा वाघ वारंवार विचारात आहे. माझे भांडण विकृतीविरुद्ध आहे. सार्वजनिक ठिकाणी तोकडे कपडे घालून येणे हे आम्ही खपवून घेणार नाही. बोलणाऱ्यांना थोड्या लाजा वाटल्या पाहिजे, व्यक्ती स्वातंत्र्य म्हणून कपडे घालायचं नाही काय? मला घाणेरड्या पद्धतीने घेरले जात आहे. या विकृतीला महाराष्ट्रातून हकलले पाहिजे, अशी संतप्त भूमिका चित्रा वाघ यांनी घेतली आहे.