केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी नाकारला देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनामा, म्हणाले-पक्षासाठी काम सुरु ठेवा

शनिवार, 8 जून 2024 (09:53 IST)
लोकसभा निवडणुकीमध्ये या वेळेस महाराष्ट्र आणि उत्तरप्रदेश मध्ये भाजपचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे युपीमधून भाजप अध्यक्ष भूपेंद्र चौधरी यांनी तर महाराष्ट्रातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याजवळ राजीनामा दिला. तसेच राज्यामध्ये एनडीए चे खराब प्रदर्शनाची जवाबदारी घेत राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. 
 
निवडूक परिणाम आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस हे राजीनामा दयायचा म्हणून अडून बसले. पण अमित शहा यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला नाही. शाह यांनी फडणवीसांना सरकारमध्ये आपले काम पुढे चालू ठेवा असे सांगितले. माजी मुख्यमंत्री फडणवीस, शिवसेना चे एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार नेतृत्व वाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोबत महाराष्ट्र सरकारचा भाग आहे. 
 
मागील निवडणुकीमध्ये लोकसभा निवडणूक 2019 मध्ये अविभाजित शिवसेना आणि भाजप ने 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये 48 पैकी 41 सीट मिळवली होती. महायुतीला फक्त 17 सीट जिकंण्यामध्ये यश मिळाले होते. तर वेळेस महाराष्ट्रामध्ये सत्तारूढ युती ने राज्यामधील 48 सिटांपैकी फक्त 17 सीट मिळाल्या आहेत. काँग्रेस, शिवसेना युबीटी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युती महाविकास आघाडीने महाराष्ट्रात 30 लोकसभा सीट मिळवल्या आहे. 
 
यामुळे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात झालेले एनडीए चे खराब प्रदर्शन याची जवाबदारी घेत राजीनामा देण्याचा निर्णय घेतला पण अमित शहा यांनी तो फेटाळून लावला. तसेच अमित शहा म्हणाले की, ''जर तुम्ही राजीनामा दिला तर यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांचे मनोबल  दुबळे होईल. म्हणून राजीनामा देऊ नका व कार्य करत रहा.  

Edited By- Dhanashri Naik 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती