'बाळासाहेबांचे चिरंजीव म्हणून उद्धव ठाकरेंना पक्ष प्रमुख म्हणतात'; उदय सामंत यांनी काय दावे केले?

मंगळवार, 12 डिसेंबर 2023 (10:10 IST)
दीपाली जगताप
"एक महत्त्वाची गोष्ट इथे सांगितली पाहिजे. 1999 सालच्या शिवसेनेचा घटनेतील अमेंडमेंटमध्ये पक्ष प्रमुख हे पद नसताना देखील पक्ष प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव म्हणून आम्हाला सर्वांना आदर होता, म्हणून पक्ष प्रमुख असा उल्लेख आमच्याकडून होत होता."
 
शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी त्यांच्या फेर तपासणीदरम्यान हे वक्तव्य केलं.
 
शिवसेना आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे. नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान ही सुनावणी होत आहे.
 
सर्वोच्च न्यायालयाने राहुल नार्वेकर यांना या प्रकरणाचा निकाल 31 डिसेंबरपूर्वी द्यायला सांगितल्याने आता ही सुनावणी अंतिम टप्प्यात पोहचली आहे. सध्या शिंदे गटाचे आमदार आणि मंत्र्यांची उलट तपासणी सुरू आहे.
 
सोमवारी (11 डिसेंबर 2023) उद्योग मंत्री उदय सामंत आणि शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची साक्ष सुरू झाली.
 
या दरम्यान त्यांनी अनेक मोठे दावे आणि गौप्यस्फोट केले. नेमकं काय घडलं? जाणून घेऊया.
 
उद्धव ठाकरे पक्षप्रमुख असल्याचे मान्य पण...
शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांच्याकडून शिवसेनेच्या शिंदे गटाच्या आमदारांची उलट तपासणी सुरू आहे.
 
गेल्या वर्षी 21 जून 2022 पासून पुढे सुरत-गुवाहटी आणि आसामला गेलेल्या आमदारांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात पक्षांतर बंदी कायद्याचे उल्लंघन केले नसल्याचे पुरावे मांडले आहेत. या प्रतिज्ञापत्रात आमदारांनी नमूद केलेल्या माहितीसंदर्भात किंवा पुराव्यांसंदर्भात वकील देवदत्त कामत आमदारांना फेर प्रश्न विचारत आहेत.
 
शिंदे गटाचा सर्वात मोठा दावा आहे की, शिवसेना राजकीय पक्षाच्या घटनेत पक्ष प्रमुख हे पद कधीही कायदेशीररित्या निर्माण करून घेतलेले नाही. यामुळे पक्षात पक्ष प्रमुख असं कुठलंही पद नाही.
 
यामुळे पक्षाचे प्रमुख किंवा अध्यक्ष म्हणून उद्धव ठाकरे यांच्या निर्णयांवर किंवा नियुक्त्यांवरच थेट कायदेशीर प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न शिंदे गटाकडून सुरुवातीपासून केला जात असल्याचं दिसून येतं.
 
तर दुसरीकडे ठाकरे गटाच्या वकिलांकडून पक्ष प्रमुख हे पद घटनेत नमूद असून एवढ्या वर्षांपासून शिवसेनेच्या सर्व आमदारांना हे पद मान्य होतं आणि त्यानुसारच पक्षाचं कामकाज सुरू होतं असं सिद्ध करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
 
उद्योग मंत्री उदय सामंत यांनाही पक्ष प्रमुख पदाबाबत अनेक प्रश्न विचारण्यात आले.
 
देवदत्त कामत- शिवसेना पक्षाची नेतृत्व रचना निवडणूक आयोगाला कळवते व ते सार्वजनिकही उपलब्ध आहे का?
 
उदय सामंत- शिवसेना घटनेबाबत माझा अभ्यास नाही. 1999 च्या घटनेनुसार पक्ष चालतो अशी माझी धारणा आहे.
 
देवदत्त कामत - उद्धव ठाकरे त्यावेळी म्हणजेच 31 आॅक्टोबर 2019 रोजी पक्षप्रमुख होते हे खरं आहे का?
 
उदय सामंत - होय.
 
देवदत्त कामत - उद्धव ठाकरे जून, जुलै 2022 पर्यंत शिवसेनेचे पक्षप्रमुख होते हे खरे आहे का?
 
उदय सामंत - मला वाटतं की जून आणि जुलै ज्याचा उल्लेख केला आहे त्याच्या काही कालावधी आधी पक्षात काही विशिष्ट गोष्टींबाबत मतभेद झाले होते. ही पार्श्वभूमी नाकारता येणार नाही.
 
देवदत्त कामत - 31 आॅक्टोबर 2019 रोजी झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी शिवसेना राजकीय पक्षाच्यावतीने निर्णय घेतले. हे खरे आहे का?
 
उदय सामंत - मी मगाशी सांगितले. निर्णय आमदारांच्या ठरावाने झालेला आहे.
 
देवदत्त कामत - 31 आॅक्टोबर 2019 रोजी झालेल्या बैठकीत एकनाथ शिंदे यांची शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी निवड झाली होती ना की शिवसेना राजकीय पक्षाच्या नेतेपदी. हे तुम्ही पॅरा 6 मध्ये सांगत आहात. बरोबर आहे का?
 
उदय सामंत - आमदारांच्या बैठकीत हा ठराव झालेला होता. एकनाथ शिंदे यांना गटनेते म्हणून जाहीर करण्यात आलं होतं. आमदारांनी हा ठराव केला होता.
 
देवदत्त कामत - मी तुम्हाला सांगू इच्छितो की, आपण किंवा इतर आमदारांनी मविआ संपुष्टात आणावी अशी विनंती केली नव्हती. हे चूक की बरोबर?
 
उद्योग मंत्री उदय सामंत यांनाही पक्ष प्रमुख पदाबाबत अनेक प्रश्न विचारण्यात आले.
 
देवदत्त कामत- शिवसेना पक्षाची नेतृत्व रचना निवडणूक आयोगाला कळवते व ते सार्वजनिकही उपलब्ध आहे का?
 
उदय सामंत- शिवसेना घटनेबाबत माझा अभ्यास नाही. 1999 च्या घटनेनुसार पक्ष चालतो अशी माझी धारणा आहे.
 
देवदत्त कामत - उद्धव ठाकरे त्यावेळी म्हणजेच 31 आॅक्टोबर 2019 रोजी पक्षप्रमुख होते हे खरं आहे का?
 
उदय सामंत - होय.
 
देवदत्त कामत - उद्धव ठाकरे जून, जुलै 2022 पर्यंत शिवसेनेचे पक्षप्रमुख होते हे खरे आहे का?
 
उदय सामंत - मला वाटतं की जून आणि जुलै ज्याचा उल्लेख केला आहे त्याच्या काही कालावधी आधी पक्षात काही विशिष्ट गोष्टींबाबत मतभेद झाले होते. ही पार्श्वभूमी नाकारता येणार नाही.
 
देवदत्त कामत - 31 आॅक्टोबर 2019 रोजी झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी शिवसेना राजकीय पक्षाच्यावतीने निर्णय घेतले. हे खरे आहे का?
 
उदय सामंत - मी मगाशी सांगितले. निर्णय आमदारांच्या ठरावाने झालेला आहे.
 
देवदत्त कामत - 31 आॅक्टोबर 2019 रोजी झालेल्या बैठकीत एकनाथ शिंदे यांची शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी निवड झाली होती ना की शिवसेना राजकीय पक्षाच्या नेतेपदी. हे तुम्ही पॅरा 6 मध्ये सांगत आहात. बरोबर आहे का?
 
उदय सामंत - आमदारांच्या बैठकीत हा ठराव झालेला होता. एकनाथ शिंदे यांना गटनेते म्हणून जाहीर करण्यात आलं होतं. आमदारांनी हा ठराव केला होता.
 
देवदत्त कामत - मी तुम्हाला सांगू इच्छितो की, आपण किंवा इतर आमदारांनी मविआ संपुष्टात आणावी अशी विनंती केली नव्हती. हे चूक की बरोबर?
 
उदय सामंत - हे चुकीचं आहे. विनंती केली होती.
 
देवदत्त कामत - तुम्ही प्रतिज्ञापत्रात लिहिलेलं आहे की, "पक्षाच्या बहुसंख्य लोकप्रतिनिधींनी एकनाथ शिंदे यांना समर्थन दिलं" हे चूक आणि तथ्यहीन आहे.
 
उदय सामंत - हे चुकीचं आहे. एक महत्त्वाची गोष्ट इथे सांगितली पाहिजे. 1999 च्या अमेंडमेंटमध्ये पक्ष प्रमुख हे पद नसताना देखील पक्ष प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव म्हणून आम्हाला सर्वांना आदर होता, म्हणून पक्ष प्रमुख असा उल्लेख आमच्याकडून होत होता. तरी देखील आमदारांशी आणि पदाधिकाऱ्यांशी संपर्क नसल्याने लोकप्रतिनिधी तसंच पदाधिकारी आपल्या सर्व अडीअडचणी गेली कित्येक वर्षे शिवसेनेचे नेते म्हणून काम करणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या समोर मांडायचे आणि शिवसेना नेते म्हणून एकनाथ शिंदे सर्वांना न्याय द्यायचे.
 
कामत - क्रमांक 56 चे उत्तर देताना तुम्ही म्हटलंय की "we address Uddhav Thackeray as Paksha pramukh." 'पक्ष प्रमुख' हा शब्द कुठून घेतला?
 
उदय सामंत - काही नेते मंडळींची इच्छा होती आणि आदरापोटी सर्वांनी ते उचलून धरले.*
 
देवदत्त कामत - उद्धव ठाकरे यांची शिवसेना राजकीय पक्षाच्या अध्यक्षपदी बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर 2012 मध्ये एकमताने निवड झाली. हे खरे आहे का?
 
सामंत - मला याबाबत माहिती नाही. 2012 मध्ये मी पक्षात नव्हतो. - हे चुकीचं आहे. विनंती केली होती.
 
देवदत्त कामत - तुम्ही प्रतिज्ञापत्रात लिहिलेलं आहे की, "पक्षाच्या बहुसंख्य लोकप्रतिनिधींनी एकनाथ शिंदे यांना समर्थन दिलं" हे चूक आणि तथ्यहीन आहे.
 
उदय सामंत - हे चुकीचं आहे. एक महत्त्वाची गोष्ट इथे सांगितली पाहिजे. 1999 च्या अमेंडमेंटमध्ये पक्ष प्रमुख हे पद नसताना देखील पक्ष प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव म्हणून आम्हाला सर्वांना आदर होता, म्हणून पक्ष प्रमुख असा उल्लेख आमच्याकडून होत होता. तरी देखील आमदारांशी आणि पदाधिकाऱ्यांशी संपर्क नसल्याने लोकप्रतिनिधी तसंच पदाधिकारी आपल्या सर्व अडीअडचणी गेली कित्येक वर्षे शिवसेनेचे नेते म्हणून काम करणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या समोर मांडायचे आणि शिवसेना नेते म्हणून एकनाथ शिंदे सर्वांना न्याय द्यायचे.
 
कामत - क्रमांक 56 चे उत्तर देताना तुम्ही म्हटलंय की "we address Uddhav Thackeray as Paksha pramukh." 'पक्ष प्रमुख' हा शब्द कुठून घेतला?
 
उदय सामंत - काही नेते मंडळींची इच्छा होती आणि आदरापोटी सर्वांनी ते उचलून धरले.*
 
देवदत्त कामत - उद्धव ठाकरे यांची शिवसेना राजकीय पक्षाच्या अध्यक्षपदी बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर 2012 मध्ये एकमताने निवड झाली. हे खरे आहे का?
 
सामंत - मला याबाबत माहिती नाही. 2012 मध्ये मी पक्षात नव्हतो.
 
उद्धव ठाकरे यांचं शिवसेना-भाजप सत्तास्थापनेचं आश्वासन?
महाविकास आघाडीचं सरकार असताना म्हणजेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना शिवसेना भाजप युतीसाठी प्रयत्न झाले होते. इतकच नाही तर काही काळानंतर युती होऊन सत्तास्थापन करू असं आश्वासनही उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या आमदारांना दिलं होतं असा गौप्यस्फोट उदय सामंत यांनी केला आहे.
 
आपल्या साक्षी दरम्यान उदय सामंत यांना शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आघाडी केल्याने तुम्ही नाराज होता का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, होय मी नाराज होतो. परंतु भाजपसोबत युती होणार आहे अशी समजून उद्धव ठाकरे यांनी काढल्याने मी मंत्रिपदाची शपथ घेतली, असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे.
 
देवदत्त कामत - तुम्ही तुमच्या प्रतिज्ञापत्राच्या परिच्छेद पॅरेग्राफ 10 मध्ये म्हटल्याप्रमाणे, शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी (मविआ) यांच्या निवडणुकीनंतरच्या आघाडीमुळे नाराज होतात. हे खरे आहे का?
 
उदय सामंत - होय. मी नाराज होतो.
 
देवदत्त कामत - तुम्ही 2019 पासून जून 2022 पर्यंत उच्च व तंत्र शिक्षण खात्याचे मंत्रीपद स्वीकारण्याइतपत तुम्ही नाराज होता का?
 
उदय सामंत - मी मंत्रिपदाची शपथ घेतली त्यापूर्वी देखील गटनेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही उद्धव ठाकरे यांना भेटलो होतो. त्यावेळी आम्हाला आश्वासन दिले होते की, जी निवडणूक आपण नैसर्गिक युतीत लढलो भविष्यात तशाच पद्धतीने कार्यवाही होईल. नक्की पुन्हा काही कालावधीनंतर तुम्ही केलेली मागणी मान्य होईल अशी समजूत काढल्याने पुन्हा काही कालावधीनंतर भाजपला सोबत घेऊनच सरकार स्थापन केले जाईल अशा प्रकारचे आश्वासन दिले गेले म्हणून मी मंत्रिमंडळात सामील झालो.
 
उद्धव ठाकरे यांना तुम्ही 2019 मध्ये भाजपसोबत युती करावी यासाठी भेटला होता असं तुम्ही म्हणत आहात मग तुम्ही एकनाथ शिंदे यांना ही विनंती तेव्हा का नाही केली?
 
उदय सामंत -आम्ही गटनेते म्हणून
 
एकनाथ शिंदे यांना विनंती केली होती. आमच्या मागणीनुसार एकनाथ शिंदे यांनीही ऊद्धव ठाकरे यांची भेट घेऊन सांगितले होते पण त्याचा काही उपयोग झाला नाही.
 
देवदत्त कामत - मी तुम्हाला सांगू इच्छितो की, तुम्ही आणि एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना विनंती केली होती की भाजप सोबत युती करावी कारण उद्धव ठाकरे पक्ष प्रमुख होते आणि ते राजकीय पक्षाचे प्रतिनिधित्व करतात. हे खरे आहे का?
 
उदय सामंत - हे बरोबर आहे.
 
'सही माझी नाही'
शिंदे गटाच्या साक्ष दिलेल्या आमदारांनी व्हिपच्या पोचपावतीवरील स्वाक्षरी तसंच 21 जून रोजी उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री निवासस्थान झालेल्या बैठकीतील ठरावावरील स्वाक्षरी आपली नसल्याचं म्हटलं आहे.
 
दिलीप लांडे यांच्यानंतर आता उदय सामंत यांनीही सुनावणी दरम्यान सादर केलेल्या या कागदपत्रांवरील स्वाक्षरी आणि हस्ताक्षर आपलं नसल्याचं म्हटलं आहे.
 
देवदत्त कामत - 1 जून 2022 रोजी तुम्ही वर्षा बंगल्यावरील बैठकीला हजेरी लावली कारण तुम्हाला 21 जून 2022 रोजी सुनील प्रभू यांनी व्हिप बजावला होता. हे खरे आहे का?
 
उदय सामंत - 21 तारखेला माझे विधिमंडळातील सदस्य गुलाबराव पाटील यांनी वर्षा बंगल्यावर बैठक असल्याचे मला सांगितले आणि निमंत्रण दिले. परंतु ही बैठक कशासंदर्भात आहे हे सांगितले नव्हते.
 
मी या बैठकीला उपस्थित होतो. परंतु त्यादिवशी किंवा त्यानंतर मला कुठलाही व्हिप देण्यात आलेला नाही. मी तो स्वीकारलेला नाही. आणि कोणतीही सही कुठच्याही कागदावर केलेली नाही.
 
देवदत्त कामत - उदय सामंत यांना 21 जून 2022 रोजी व्हिप मिळाल्याच्या पोचपावतीवर सही केल्याची मूळ प्रत दाखवण्यात आली. हे खरे आहे का?
 
उदय सामंत - ही सही माझी नाही. हा व्हीप मी स्वीकारलेला नव्हता. परंतु माझ्या मर्यादीत माहितीनुसार व्हीप हा सभागृहातील कामकाजासाठी किंवा मतदानासाठी असतो. माझ्या हातात जो कागद ठेवला आहे त्यावरून मला असे वाटते की हा व्हिप नसून ते पत्र आहे. त्यावर असलेली सही माझी नाही. त्यामुळे तो स्वीकारायचा प्रश्नच नाही. असा कागद किंवा पत्र खाजगी कार्यक्रमाचे देखील निघू शकते.
 
देवदत्त कामत - या कागदपत्रावरील हस्ताक्षर तुमचं आहे का? (21 जून 2022 रोजीच्या बैठकीचं हजेरी पत्रक दाखवण्यात आलं. स्वाक्षरीचं हस्ताक्षर)
 
उदय सामंत - नाही.
 
ठाकरेंचे वकील - तुम्हाला दाखवलेले हे डाॅक्युमेंट 2022 चा पक्षादेश (व्हिप) स्वीकारल्याची पोचपावती आहे ना की खाजगी कार्यक्रमाचं निमंत्रण. हे बरोबर आहे का?
 
सामंत - मी कोणत्याही कागदावर सही केलेली नाही. मला व्हिप मिळालेला नाही. या डाॅक्युमेंटवरील स्वाक्षरी माझी नाही.
 
21 जून 2022 बैठकीचा ठरावाच्या काॅपी सामंतांना दाखवण्यात आली. या ठरावानंतर यावरील आमदारांच्या सगळ्यांमध्ये उदय सामंत यांच्या नावासमोर स्वाक्षरी आहे.
 
ठाकरेंचे वकील - या डाॅक्युमेंटवरील हस्ताक्षर, सही आपले आहे. हे बरोबर का?
 
उदय सामंत - या कागदावरील स्वाक्षरी किंवा हस्ताक्षर माझे नाही.
 
उदय सामंत - हे डाॅक्युमेंट जरी आत्ता पाहिले असले तरी माझ्या वकिलांनी मला ब्रीफ केले होते. यातील महत्त्वाची बाब म्हणजे 21 तारखेच्या बैठकीनंतर मी शासकीय निवासस्थानी आलो त्यावेळी मी सोशल मीडियावर आणि टिव्हीवर पाहिलं की मी कोणत्याही कागदपत्रावर किंवा व्हिपवर सही न करताही त्यावेळी माझ्या नावाचा उपयोग करून एकनाथ शिंदे यांना हटवण्याची कारवाई करण्यात आली होती.
 
कामत - मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही तुमच्या पिटीशनमध्ये सही नाकारलेली नाही. कारण ती तुमची सही आहे. हे बरोबर आहे का?
 
सामंत - मी याच्याशी सहमत नाही. ती सही माझी नाही.
 
देवदत्त कामत - तुम्ही 21 जून 2022 च्या बैठकीतील हजेरी पत्रकावरील तुमची सही नाकारत आहात ते खरंतर तुम्हाला नंतर सुचलेलं आहे आणि खोटं आहे.
 
उदय सामंत - हे चुकीचं आहे.
 
देवदत्त कामत - मी सांगतो की तुम्ही सादर केलेले annexure R-2 जे आॅगस्ट 2022 मध्ये केले होते त्यातही तुम्ही तुमची स्वाक्षरी नाकारलेली नाही.
 
उदय सामंत - हे चूक आहे.
 
निवडणुकीच्या एबी फाॅर्मवरील सही कोणाची?
विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाकडून तिकीट मिळाल्यानंतर उमेदवार अर्ज भरण्यासाठी जातात. यावेळी उमेदवारांना पक्षाकडून एबी फाॅर्म दिला जातो. यावर पक्षाच्या अध्यक्षांचीही स्वाक्षरी असते.
 
यावरूनच उदय सामंत यांना देवदत्त कामत यांनी प्रश्न विचारले.
 
देवदत्त कामत- शिवसेनेत कधी प्रवेश केला?
 
उदय सामंत- 2014 मध्ये शिवसेनेत प्रवेश केला.
 
देवदत्त कामत - 2014 पूर्वी कुठल्या पक्षात होता?
 
उदय सामंत- राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होतो.
 
देवदत्त कामत - कितीवेळा आमदार झालात व कोणत्या पक्षाकडून?
 
उदय सामंत- मी चारवेळा आमदार राहिलो. दोनवेळा राष्ट्रवादी आणि दोन वेळा शिवसेना.
 
देवदत्त कामत- 2014 मध्ये तुम्ही भाजपविरोधात निवडणूक लढवली होती. हे सत्य आहे का?
 
उदय सामंत- होय. कारण सर्वच पक्ष वेगळे लढले होते.
 
देवदत्त कामत- तुम्ही तुमच्या शपथपत्रात म्हटले आहे की,1999 ते 2019 पर्यंत भाजपसोबत नैसर्गिक युती होती. ही बाब संपूर्ण सत्य नाही.
 
उदय सामंत- ही नैसर्गिक युती होती. 2019 मध्ये एकत्र लढलो.पण 2014 मध्ये युती का झाली नाही,याची मला माहिती नाही.
 
देवदत्त कामत- राष्ट्रवादीत असताना एबी फॉर्मवर कुणाची सही असायची?
 
उदय सामंत - राष्ट्रवादी असो किंवा इतरवेळी निवडणूक लढलो तेव्हा पार्टीवर विश्वास ठेवून एबी फॉर्म घ्यायचो. त्यामुळे सही बघायची वेळ नाही आली.
 
देवदत्त कामत- म्हणजे तुम्ही पक्ष नेतृत्वावर विश्वास ठेवून एबी फॉर्म घ्यायचा का?
 
उदय सामंत- एबी फॉर्म कोण देते याचा कधीच अभ्यास केला नाही.
 
देवदत्त कामत- पक्षातील कोणताही नेता एबी फॉर्म देऊ शकतो का ? किंवा त्या पक्षाचे नेतृत्व एबी फॉर्म देते?
 
उदय सामंत - याचा अभ्यास मी केला नाही.
 
देवदत्त कामत- 2019 च्या एबी फॉर्मवर शिवसेना महासचिव सुभाष देसाई व सचिव अनिल देसाई यांच्या सही होती का?
 
उदय सामंत- फक्त एबी फॉर्म घेतला होता.सही कुणाची होती माहिती नाही.
 
अध्यक्ष निवडणुकीत शिवसेना सोडून भाजपला मतदान केलं?
शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केल्यानंतल 3 जुलै 2022 रोजी पार पडलेल्या विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी मतदान केले. भाजपकडून राहुल नार्वेकर आणि शिवसेनेकडून राजन साळवी हे दोघं उमेदवार होते. परंतु शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान न करता भाजपच्या उमेदवाराला (जे मविआ सरकारमध्ये विरोधक होते) मतदान केल्याचं सिद्ध करण्याचा प्रयत्न ठाकरे गटाच्या वकिलांचा आहे.
 
देवदत्त कामत - तुम्हाला 2 जुलै 2022 रोजी [email protected] या इमेल आयडीवरती दोन व्हिप मिळाले जे सुनील प्रभू यांनी पाठवले होते.
 
उदय सामंत - माझ्या इमेल आयडीवरती मला कोणताही मेल मिळालेला नाही.
 
देवदत्त कामत - राजन साळवी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या तिकीटावर आमदार झाले याची कल्पना आहे का?
 
उदय सामंत - होय.
 
देवदत्त कामत - तुम्ही 3 जुलै 2022 रोजी विधानसभेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी तुम्ही भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर यांच्यासाठी मतदान केले का?
 
उदय सामंत - माझ्या सदसद्विवेक बुद्धी प्रमाणे राहुल नार्वेकर यांना मतदान केले होते. कारण महाराष्ट्र विधानसभेचे कामकाज ते योग्य त-हेने चालवतील अशी खात्री होती.
 
(या उत्तरानंतर सगळेच हसले. ठाकरे गटाचे काही वकील म्हणाले. Buttering the judge. अध्यक्षही हसले.)
 
देवदत्त कामत - 3 जुलै 2022 रोजी अध्यक्षांच्या निवडणुकीसाठी शिवसेना राजकीय पक्षाने व्हिप बजावला होता का?
 
उदय सामंत - मला जी माहिती आहे त्यानुसार अध्यक्षांच्या निवडणुकीसाठी व्हिपची आवश्यकता नाही. मी माझी सदसद्विवेक बुद्धी जागृत ठेऊन योग्य त्या व्यक्तीस मतदान केले. त्यावेळी देखील व्हिप मिळालेला नव्हता.
 
देवदत्त कामत - म्हणजे तुमच्यामते शिवसेना विधिमंडळ पक्षाने अध्यक्ष पदासाठी व्हिप बजावला नव्हता?
 
उदय सामंत - मला मिळालेला नाही. बाकीचं मला माहिती नाही.
 
मंत्री दीपक केसरकर यांचा मोठा दावा
उदय सामंत यांच्यापाठोपाठ मंत्री दीपक केसरकर यांच्या उलट तपासणीला सुरुवात झाली आहे. मंगळवारी (12 डिसेंबर) केसरकर यांची उलट तपासणी पूर्ण होईल. परंतु सोमवारच्या उलट तपासणीदरम्यान केसरकर यांनीही उदय सामंत यांच्याप्रमाणेच मविआ सरकारच्या काळात शिवसेना-भाजप युतीसाठी प्रयत्न झाल्याची माहिती दिली आहे.
 
देवदत्त कामत - तुमच्या पुराव्यांच्या प्रतिज्ञापत्रात तुम्ही परिच्छेद 6 मध्ये ज्या घडामोडी सांगत आहात त्या 21 जून 2022 च्या आहेत का?
 
केसरकर - होय 2022 पूर्वीच्या.
 
कामत - मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही किंवा इतर नेते ज्यांचा उल्लेख तुम्ही परिच्छेद 6 मध्ये केला आहे त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत पक्षाच्या हिंदुत्ववादी विचारधारा सोडण्याबाबत कधीही भाष्य केलं नाही. हे बरोबर आहे का?
 
केसरकर - हे बरोबर नाही. मी शिवसेनेचे काम आणि हिंदुत्ववादी विचारधारेबाबत उद्धव ठाकरे यांच्याकडे बोललो होतो. तसंच भाजपसोबत युती करण्याचेही बोललो होतो.
 
मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांशी भेट घडवून आणली होती. ही भेट 8 जून 2021 रोजी झाली होती ज्यावेळी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री अशोक चव्हाण भेटण्यासाठी गेले होते.
 
या भेटीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तत्कालीन उद्धव ठाकरे यांच्यात वैयक्तिक भेट झाली.
 
यानंतर भेटीबाबत उद्धव ठाकरे यांनी मला सांगितले होते. मला मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही पक्षांनी एकत्र येण्याचे ठरवले होते. मुंबईला पोहचल्यानंतर 15 दिवसांच्या आत मविआचं सरकार बरखास्त करून युतीची पूनर्स्थापना महाराष्ट्रात करण्यात येईल असा शब्द नरेंद्र मोदी यांना दिला होता. परंतु मला माझ्या सहका-यांची समजून घालायला लागेल त्यासाठी अधिकच काही वेळ लागेल असा निरोप मी पंतप्रधान मोदींना द्यावा असे मला सांगितले होते. हा निरोप मी दिल्ली पोहोचवण्याची व्यवस्था केली होती. दोन्ही पक्षातील लोकांनी एकत्र यावे ही पक्षातील बहुतांश लोकांची उच्छा होती. याला विलंब होत असल्याने मी माझ्या पक्षातील ज्येष्ठ लोकांना याची माहिती दिली. यात सुभाष देसाई, अनिल देसाई, एकनाथ शिंदे यांना ही माहिती दिली आणि त्यांना याबाबतचा निर्णय लवकर होण्याबाबतची विनंती उद्धव ठाकरे यांना करावी अशी विनंती केली.
 
देवदत्त कामत - हे म्हणणं योग्य राहील का की मविआतून बाहेर पडल्यानंतर भाजपसोबत युती करण्याचा निरोप उद्धव ठाकरे यांना घ्यायचा होता?
 
दीपक केसरकर - कारण ते मुख्यमंत्री होते.
 
देवदत्त कामत - मी तुम्हाला सांगू इच्छितो की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते आँि शिवसेनेचे अध्यक्ष होण्याच्या नात्याने त्यांना निर्णय घ्यायचा अधिकार होता. हे बरोबर आहे का?
 
दीपक केसरकर - त्यांना मुख्यमंत्री म्हणून निर्णय घ्यायचा होता आणि राज्यपालांना कळवायचे होते. ते बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असल्याने आम्ही त्यांना पक्ष प्रमुख म्हणत होतो. निवडणूक आयोगाकडे पक्षाची काय माहिती आहे याची मला कल्पना नाही.
 
शिवसेना आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी सुनावणी आता अंतिम टप्प्यात असून पुढील दोन दिवसांत दोन्ही गटाकडून उलट तपासणी पूर्ण केली जाईल. त्यानंतर काही दिवसांतच राहुल नार्वेकर याबाबत निकाल स्पष्ट करण्याची शक्यता आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती