या घटनेत दोन वर्षांची भार्गवी उर्फ परी सागर रोही ही आपले आजोबा रवींद्र किसनराव रोही यांच्यासोबत शनिवारी संध्याकाळी गावातीलच यात्रेत गेली होती. उडणारा फुगा बघून भार्गवीने आपल्या आजोबांकडे फुगा घेण्याचा हट्ट धरला. परीला घेऊन आजोबा फुगे विक्रेत्याजवळ पोहोचले. फुगा विक्रेता फुग्यात गॅस भरत असताना अचानक गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोट इतका भीषण होता की भार्गवी जागीच कोसळली.