दोघा पोलिसांवर जबरी चोरीचा गुन्हा, दोघे गेले होते छापा टाकायला

बुधवार, 1 मे 2019 (09:41 IST)
वर्धा येथे वेगळीच घटना घडली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करण्या ऐवजी त्यांच्यावरच गुन्हा दाखल झाला आहे. अल्लीपूर भागातील 2 पोलीस कर्मचाऱ्यांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांवर मासळी विक्रेत्याचे पैसे हिसकावल्या मुळे नागरिकांनी पैसे हिसकावल्यानंतर स्थानिक गावकऱ्यांनी संबंधित पोलिसांना बेदम मारहाण केली. तसेच जबरी चोरीचा गुन्हाही दाखल केला.
 
सविस्तर वृत्त असे की, पूर्ण दिवसभरातील व्यवसायाचा हिशेब सुरु होता, पोलिसांनी जुगार समजून मांसळी विक्रेत्यांचे पैसे हिसकल्याचे सांगण्यात येत आहे. हे पैसे हिसकावण्याचा हाच प्रकार पोलिसांच्या अंगलट आला आहे. गावातील नागरिकांनी दोन्ही पोलिसांना चोर समजून मारहाण केली आहे. या प्रकरणी पोलिसांच्या तक्रारीवरुन 15 ते 20 जणांवर मारहाणीचा गुन्हा दाखल केला तर स्थानिकांच्या तक्रारीवरुन या 2 पोलीस कर्मचार्‍यांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. सचिन सुरकार, राजरत्न खडसे अशी गुन्हा दाखल झालेल्या पोलीस कर्मचार्‍यांची नावे असून, हिंगणघाट तालुक्याच्या अल्लीपूर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. या ठाण्यांतर्गत कात्री येथे जुगार सुरु आहे असे पोलिसांना कळले, त्यावरुन दोघेही छापा टाकायला गेले होते. तर दुसरीकडे गावकऱ्यांनी म्हणतात की कात्री परिसरात मासे विक्रेते आठवडी बाजारातून मांसळी विक्रीच्या पैशांचा हिशेब करत बसले होते. त्यावेळी गणवेश नसलेल्या पोलिसांनी विक्रेत्यांकडून पैसे ओढून घेतले, त्यावेळी उपस्थितांनी दोघांनाही चोर समजून मारहाण केली आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती