मुंबईमध्ये चोरीचे प्रमाण कमी झालेले नाही

सोमवार, 15 एप्रिल 2019 (17:04 IST)
मुंबईत सुरक्षिततेच्या दृष्टीने 949 कोटी रुपये खर्च करुन सहा हजार सीसीटीव्ही कॅमरे 2016 मध्ये लावण्यात आले आहेत. तरीसुद्धा गुन्हयात कोणत्याही प्रकारची विशेष कमी आली नाही.गेल्या सहा वर्षात 45 कोटी 69 लाख 50 हजार 582 रुपये इतकी किंमतीच्या मालमत्ता किंवा रोख जबरी चोरी झाली आहे, अशी माहिती आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांना मुंबई पोलिसांनी दिली आहे.
 
आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मुंबई पोलीस विभागाकडे  2013 पासून 2018 पर्यंत मुंबईत किती जबरी चोरीच्या गुन्ह्याची नोंद झाली आहे. तसेच, किती गुन्ह्याची उघड झाली आहे आणि किती किंमतीच्या मालमत्ता किंवा रोख चोरी झाली आहे. तसेच पोलिसांनी किती किंमतीच्या मालमत्ता किंवा रोख हस्तगत केले आहे याबाबत माहिती विचारली होती. त्यानुसार मुंबई पोलीस गुन्हे शाखेचे शासकीय माहिती अधिकरी तथा सहाय्यक पोलीस आयुक्त (प्रतिबंधक) रमेश गावित यांनी शकील अहमद शेख यांना दिलेल्या माहितीवरून मुंबईत जबरी चोरीचे प्रमाण दुपट्टीने वाढले असल्याचं स्पष्ट होत आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती