राज्य पोलिस दलातील पोलिस अधिकारी आणि पोलिस कर्मचार्यांना पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. आता राज्यातील पोलिस अधिकारी व कर्मचार्यांच्या बदल्या 31 ऑगस्ट 2021 पर्यंत होणार आहेत.दरम्यान, एकूण कार्यरत पदांच्या 35 टक्के एवढया मर्यादत या बदल्या होणार आहेत. 35 टक्क्यांपेक्षा जास्त बदल्या करावयाच्या झाल्यास त्यास मुख्यमंत्री यांची मान्यता घेणे आवश्यक आहे.याबाबतचे आदेश गृह विभागाकडून काढण्यात आले आहेत.
राज्य पोलिस दलातील सर्वसाधारण बदल्यांना पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. यापुर्वी 14 ऑगस्टपर्यंतच बदल्या करण्यात याव्यात असा आदेश काढण्यात आला होता. आता 31 ऑगस्ट 2021 पर्यंत राज्यातील पोलिस अधिकारी व कर्मचार्यांच्या बदल्या करण्यात याव्यात असा आदेश काढण्यात आला आहे. सर्वसाधारण बदल्यांची कार्यवाही दि. 31 ऑगस्ट 2021 पर्यंत पूर्ण करण्यात यावी.तथापि, त्यापुढे पुढील विशेष कारणास्तव आवश्यकतेनुसार मुख्यमंत्री यांच्या मान्यतेने 31 ऑगस्ट, 2021 नंतर ही बदल्या करता येतील.
सेवानिवृत्तीमुळे रिक्त होणारी पदे भरणेसाठी करावयाची बदली.
– कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अत्यावश्यक सेवेतील रिक्त पदे भरणेसाठी करावयाची बदली.
असल्याची बदली करणार्या सक्षम प्राधिकार्याची खात्री पटल्यास करावयाची बदली.
– विनंतीवरून करावयाची बदली.