नागपुरात वीज कोसळून आई आणि मुलासह तीन जणांचा मृत्यू

गुरूवार, 28 ऑगस्ट 2025 (08:30 IST)
बुधवारी दुपारी जिल्ह्यातील काही भागात पावसादरम्यान वीज पडून कळमेश्वर तालुक्यातील धापेवाडा गावात तीन जणांचा मृत्यू झाला. कळमेश्वर तालुक्यातील धापेवाडा गावात ही घटना घडली.
 
मिळालेल्या माहितीनुसार वंदना प्रकाश पाटील तिचा मुलगा ओमप्रकाश पाटील आणि एक ६० वर्षीय महिला यांचा शेतात काम करताना मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळी तपास पूर्ण केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. गणेश चतुर्थीच्या दिवशी घडलेल्या या दुर्घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. 
 
तसेच या दुर्घटनेनंतर महाराष्ट्राचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोशल मीडियावर शोक व्यक्त केला. बावनकुळे यांनी एक्स वर लिहले की, "नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील धापेवाडा येथे दुपारी वीज पडून एक हृदयद्रावक घटना घडली, जिथे शेतात काम करणाऱ्या एका आई, तिचा मुलगा आणि शेतात काम करणाऱ्या एका शेतमजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुःखद घटनेत मृत्युमुखी पडलेल्या सर्वांप्रती माझे मनापासून संवेदना. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. मी त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे. ओम शांती!"
 
Edited By- Dhanashri Naik

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती