12 कोटींची परदेशी बनावटीची गाडी वापरणाऱ्यांनी फकीर म्हणवून घेऊ नये - संजय राऊत

रविवार, 2 जानेवारी 2022 (09:58 IST)
शिवसेना खासदार संजय राऊत यांनीपंतप्रधान मोदींवर परखड टीका केली आहे. प्रधानसेवक म्हणून वावरणाऱ्या मोदींनी 12 कोटींची परदेशी बनावटीची गाडी घेतली. त्यामुळं त्यांनी यापुढं स्वतःला फकीर म्हणवून घेऊ नये असं राऊतांनी म्हटलं आहे.
 
राऊत यांनी गाडीच्या मुद्द्यावरून टीका करताना राऊत यांनी भाजपकडून नेहमी टीका होणाऱ्या नेहरूंचीही तुलना मोदींबरोबर केली. मेक इन इंडिया, स्वदेशीचा नारा देणारे परदेशी बनावटीची गाडी वापरतात. नेहरूंनी मात्र कायम स्वदेशी बनावटीची अॅम्बेसेडरच वापरली, असं राऊत म्हणाले.
 
"भाजपची सत्ता कधीही जाणार नाही असं त्यांना वाटतं. पण पश्चिम बंगालनं त्यांना धडा शिकवला. कोलकाता महापालिकेतही ते पराभूत झाले. आता नव्या वर्षात विधानसभेच्या निवडणुकांतही त्यांची घसरगुंडी होईल.
कालीचरण यांच्या कृत्याचा भाजपनं निषेधही केला नाही. त्यामुळं गांधींवर हल्ले करणाऱ्यांचे विचार मान्य असणाऱ्यांनी त्यांच्या जयंतीला समाधीवर नतमस्तक होण्याचं ढोंग तरी करू नये."
 
पंतप्रधानांनी गंगास्नान केल्यामुळं कोरोना वाहून गेलेला नाही किंवा लोकांचं नैराश्यही दूर झालेलं नाही. 2022 मध्ये तरी शहाणे व्हा. कारण चुकीच्या लोकांना अंबारीत बसवण्याचं काम तुमच्यात हातून घडलं असावं असंहा राऊत म्हणाले आहेत.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती